उस्मानाबाद जिल्ह्यातील वादग्रस्त कलेक्टर होता मोहंमद हैदर; या खूनप्रकरणी कोर्टाने सुनावली होती फाशी
कलेक्टर म्हणलं तर प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी. कलेक्टर होणं हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. पण मराठवाड्यात एक असा देखील कलेक्टर होऊन गेलाय ज्याच्यावर अनेक खुनाचे खटले चालले. त्याप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा देखील झाली होती. निजामकाळात अवघ्या 8 महिन्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचा कलेक्टर राहिलेला मोहंमद हैदर, ज्याच्यावर रझाकारांसोबत मिळून अनेक खून केल्याचा आरोप होता. तर याच हैदरबाबत […]
ADVERTISEMENT

कलेक्टर म्हणलं तर प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी. कलेक्टर होणं हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. पण मराठवाड्यात एक असा देखील कलेक्टर होऊन गेलाय ज्याच्यावर अनेक खुनाचे खटले चालले. त्याप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा देखील झाली होती. निजामकाळात अवघ्या 8 महिन्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचा कलेक्टर राहिलेला मोहंमद हैदर, ज्याच्यावर रझाकारांसोबत मिळून अनेक खून केल्याचा आरोप होता. तर याच हैदरबाबत आपण जाणून घेणार आहोत, निजाम राजवटीतील शेवटचा आणि सर्वात वादग्रस्त कलेक्टर म्हणून मोहंमद हैदरची कारकीर्द अतिशय वादळी ठरली होती.
राज्याच्या पोलीस प्रमुखाचा जावई
मोहंमद हैदर गौस, ज्याने उस्मानिया विद्यापीठातून 1936 साली चांगल्या गुणांसह बी.ए ची पदवी प्राप्त केली. पुढच्याचवर्षी हैदरने हैद्राबाद सिव्हिल सर्व्हिस कमिशन म्हणजेच HCS ची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावेळी हैद्राबाद स्टेटमध्ये प्रशासकीय प्रशिक्षण घेण्यासाठी लंडनला पाठवलं जायचं. हैदर प्रशिक्षण घेऊन आला आणि त्याला मुन्सिफ कोर्टात नियुक्ती देण्यात आली. त्यानंतर त्याकाळचे हैद्राबाद स्टेटचे पोलीस प्रमुख DG ज्यांना त्याकाळी कोतवाल असं संबोधलं जायचं, त्या नवाब दिनीयार जंग बहादूर यांच्या मुलीशी हैदरचे लग्न झाले.
हैद्राबाद स्टेटमध्ये उस्मानाबाद जिल्हा होता संवेदनशील जिल्हा
हैद्राबादच्या पोलीस प्रमुखाचा जावई म्हणून हैदरचे वजन अधिकचे वाढले होते. अशात 1948 साली हैद्राबाद संस्थानातील उस्मानाबाद जिल्ह्यात स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहू लागले. स्टेटमधील संवेदनशील जिल्हा म्हणून उस्मानाबाद ओळखलं जाऊ लागलं. सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांच्या सीमा उस्मानाबादच्या लगत असल्याने स्वातंत्र्यवीरांना स्वातंत्र्य भारतातील लोकांचं पाठबळ मिळत होतं. कारण अहमदनगर आणि सोलापूर हे जिल्हे निजाम राजवटीत येत नव्हते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातून चळवळीला गती मिळत होती.
राज्याच्या उपसचिव पदावर काम करण्याची ऑफर
अशात स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळी आणि गोरगरिबांवर रझाकारांचा होणार अत्याचार, यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातला तत्कालीन कलेक्टर फरहतुल्लाह प्रशासन चालवण्यात अयशस्वी ठरला. उस्मानाबाद जिल्हा हा निजामांसाठी डोकेदुखी ठरत होता. त्यामुळे कोणी अधिकारी यायला इथे धजावत नव्हता. अशात हैदरची बढती जवळ आली होती. त्याला मंत्रालयात उपसचिव पदावर काम करण्याची सूचना करण्यात आली.