शरद पवार आणि राज ठाकरेंचं एकमत… पण कोणत्या गोष्टीवर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार कुणी ठेवली हा कट कुणाचा, यामागे कोण आहे? हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा कोणताही मुद्दा महत्त्वाचा नाही. त्यामुळे त्याचीच सखोल चौकशी झाली पाहिजे.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काल (21 मार्च) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील याच मुद्द्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं. अंबानींच्या घराखाली गाडी कुणाच्या सांगण्यावरुन शोधण्यात आली हे शोधणं गरजेचं आहे. असं राज ठाकरे देखील म्हणाले होते. या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी राज ठाकरे इतर कोणत्याही विषयावर जास्त भाष्य केलं नव्हतं.

मोठी बातमी: …आता अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पवारांकडून क्लीन चीट

हे वाचलं का?

आता राज ठाकरेंपाठोपाठ शरद पवार यांनी देखील हाच मुद्दा महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता त्यासंबंधी अधिक काही माहिती समोर येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Mukesh ambani bomb scare case is an important issue the consensus of raj thackeray and sharad pawar)

पाहा आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार काय म्हणाले:

ADVERTISEMENT

‘दुसरा कोणताच महत्त्वाचा मुद्दा नाही, महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की, अंबानीच्या घरासमोर गाडी कोणी ठेवली. यामध्ये कोण सहभागी होते, कोणाचा हा कट आहे? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यात काही अशी नावं समोर येत आहेत की, ज्यांची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास हा एटीएस करत आहे. त्यामुळे हे ज्यांना आवडत असेल त्यांनी त्यावरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला आहे का? असा संशय निर्माण होतो आहे.’ असं शरद पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

कालच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय म्हणाले होते:

‘सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे तो म्हणजे अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवली कुणी आणि कुणाच्या सांगण्यावरुन? मुख्यमंत्री आणि अंबानी यांच्यात मधुर संबंध आहेत आणि हे सर्वश्रुतच आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला अंबानी हे सहपरिवार व्यासपीठावर हजर होते. अशावेळी कोणता पोलीस अधिकारी अंबानींकडून पैसे उकळेल? त्यामुळे अंबानींकडून पैसे काढण्यासाठी कट रचला ही थिअरी कुणी काढली मला माहित नाही.’ असं राज ठाकरे म्हणाले होते.

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास केंद्राने केल्यास ‘फटाक्याची माळ’ लागेल: राज ठाकरे

पवार आणि राज ठाकरेंनी एकच मुद्दा उपस्थित केलाए, पण…

अँटेलिया बाहेर संशयित कारचा मुद्दा हाच महत्त्वाचा आहे असं शरद पवार आणि राज ठाकरे म्हणत आहेत. पण याची चौकशी कुणी करावी याबाबत या दोन्ही नेत्यांची अगदी वेगळी मतं आहे. राज ठाकरेंच्या मते अँटेलिया प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने करावी. तर शरद पवारांच्या मते, ही चौकशी एटीएस योग्यरित्या करत आहे. पण कुणीतर त्यावरुन लक्ष हटविण्याचा प्रयत्न करत आहे.

अँटेलिया प्रकरणाची केंद्राने चौकशी करावी: राज ठाकरे

‘बॉम्ब ठेवण्यासाठी कुणाच्या सूचना असल्याशिवाय पोलीस असं धाडस करु शकणार नाही. हा विषय वाझे आणि परमबीर सिंग याच्यावर आटोपून चालणार नाही. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा. कारण महाराष्टात याची योग्य चौकशी होऊ शकणार नाही. योग्य चौकशी झाली तर फटाक्यांची माळ लागेल. सखोल चौकशी झाल्यास कल्पनेच्या बाहेरचे चेहरे तुमच्यासमोर येतील. जर केंद्राकडून देखील या विषयाची योग्य चौकशी झाली नाही तर हा देश अराजकाकडे चालला आहे एवढं निश्चित.’ असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं होतं.

अँटेलिया प्रकरणाचा तपास एटीएस योग्यरित्या करत आहे, म्हणून: शरद पवार

‘अँटेलिया प्रकरणाचा तपास हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास हा एटीएस योग्यरित्या करत आहे. पण ज्यांना हे आवडत असेल त्यांनी त्यावरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला आहे का? असा संशय निर्माण होतो आहे.’ असं पवार म्हणाले आहे.

त्यामुळे एका मुद्द्यावर दोन दिग्गज नेत्यांचं म्हणणं जरी सारखं असलं तरीही त्याच मुद्द्याशी निगडीत तपास कोणी करावा याबाबत भिन्न आणि टोकाची मतं असल्याचं देखील दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT