मुकेश अंबानींची मोठी घोषणा; दिवाळीच्या आधी या शहरात सुरु होणार 5G सर्व्हिस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Reliance AGM 2022: Jio 5G सेवा दिवाळीपासून सुरू होईल. मुकेश अंबानी यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला Jio 5G ची सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे उपलब्ध असेल. दिवाळीपर्यंत या शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होईल, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, देशभरात Jio 5G सेवा देण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. अंबानींच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2023 पर्यंत कंपनी देशभरात 5G सेवा सुरू करेल. एजीएम दरम्यान, मुकेश अंबानी म्हणाले की कंपनीने रिलायन्स जिओ 5 जी सेवेसाठी पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत.

5G स्पेक्ट्रम लिलावादरम्यान रिलायन्सने जास्तीत जास्त स्पेक्ट्रम विकत घेतले

विशेष म्हणजे 5G स्पेक्ट्रम लिलावादरम्यान रिलायन्सने जास्तीत जास्त स्पेक्ट्रम विकत घेतले आहेत. मुकेश अंबानी म्हणाले, ‘जिओने जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउटसाठी योजना तयार केली आहे’ अंबानींच्या मते, 2023 च्या अखेरीस Jio ची 5G सेवा भारतातील प्रत्येक शहर, तालुका आणि तहसीलपर्यंत पोहोचेल. ते म्हणाले की Jio 5G सेवा सर्व लोकांना आणि सर्व ठिकाणांना जोडेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Jio 5G प्लॅन?

Jio 5G प्लॅन किती स्वस्त किंवा महाग असतील हे माहीत नाही. अंबानींनी त्यांच्या भाषणात अनेक वेळा परवडणाऱ्या 5G चा उल्लेख केला आहे. यावरून हे स्पष्ट होते की Jio 5G चे प्लान Jio 4G पेक्षा जास्त महाग असणार नाहीत.

ADVERTISEMENT

Jio 5G सिम?

ADVERTISEMENT

आतापर्यंत रिलायन्स जिओने 5G सिमबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण दिवाळीला फक्त दोन महिने बाकी आहेत. त्यामुळं लवकरच कंपनी 5G प्लॅन आणि सिमची घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे. अंबानी यांनी असेही म्हटले आहे की, कंपनी भारताला डेटावर चालणारी अर्थव्यवस्था बनवू इच्छित आहे जेणेकरून आपण चीन आणि अमेरिकेला मागे टाकू.

Jio 5G साठी, कंपनी नवीनतम व्हर्जन हाय स्पीड 5G सोल्यूशन तैनात करेल ज्याला स्टँडअलोन 5G म्हणतात. इतर कंपन्या स्टँडअलोन 5G आणत नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. रिलायन्स जिओने 700MHz, 800MHz, 1800MHz, 3300MHz आणि 25GHz स्पेक्ट्रम विकत घेतले आहेत. अलीकडेच सरकारी लिलाव संपला आहे आणि जिओकडून जास्तीत जास्त स्पेक्ट्रम खरेदी करण्यात आला आहे.

जिओ 5G स्मार्टफोनची घोषणा

मुकेश अंबानी यांनी रिलायन्स एजीएम 2022 मध्ये या Jio 5G स्मार्टफोनची घोषणा देखील केली आहे. हा फोन कधी लॉन्च होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. पण यावेळी कंपनीने गुगलच्या सहकार्याने Jio 5G स्मार्टफोन सादर करण्याबाबत बोललं आहे. जिओने Google च्या सहकार्याने 4G हँडसेट लॉन्च केला होता, जो बाजारात काही खास चालला नव्हता. पहिल्या JioPhone प्रमाणे नंतर आलेले JioPhone हिट होऊ शकले नाही.

Jio 5G फोन बजेट श्रेणीचा असेल, पण किंमत काय असेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT