Mumbai Building Collapsed : बांद्र्यात इमारत कोसळून एकाचा मृत्यू, १६ जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतल्या बांद्रा या भागात एक तीन मजली इमारत कोसळली (mumbai building collapsed) आणि या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईतल्या बांद्रा या ठिकाणी शास्त्री नगर भागात ही इमारत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, एक रूग्णवाहिका आणि महापालिकेचं पथकही घटना स्थळी दाखल झालं आहे.

डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितलं की मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास मुंबईतल्या बांद्रा भागातील शास्त्रीनगर या ठिकाणी असलेली तीन मजली इमारत कोसळली. तळमजल्यावरचे सगळे नागरिक सुखरूप आहेत. पहिल्या मजल्यावरच्या ६ जणांना दुखापत झाली आहे. तर दुसऱ्या मजल्यावरच्या १७ जणांना दुखापत झाली आहे. एकाचा मृत्यू झाला आहे आणि १६ जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. साधारण २३ लोकांची सुटका करण्यात आली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता आहे त्यामुळे मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईतल्या बांद्रा या भागात उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधून कामाच्या शोधात मुंबईत आलेल्या मजुरांची मोठी वस्ती आहे. दोन दिवसांपूर्वीच तीन मजली इमारतीच्या शेजारी असलेलं घर तोडलं गेलं होतं त्यामुळे या इमारतीचा आधार काढला गेला आणि ही इमारत कोसळली असा अंदाज व्यक्त होतो आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार एक तरूण कामासाठी जात असताना त्याच्या समोर ही इमारत कोसळली. त्याने घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने फोन फिरवले. त्यानंतर जमलेल्या लोकांनीही त्यांना शक्य होईल तसं मदत आणि बचावकार्य सुरू केलं. त्यानंतर काही वेळातच महापालिका आणि अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी आले त्यांनीही बचावकार्य सुरू केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT