मुंबईवर कोरोनाच्या चौथ्या लाटेचं सावट! संसर्ग रोखण्यासाठी BMC ची प्रत्येक दारावर थाप
मुंबईत पुन्हा एकदा कोरोना डोकं वार काढताना दिसतोय. तज्ज्ञांनी जुलैमध्ये चौथी लाट येण्याचा इशारा दिला असून, आता महापालिकेनं चौथी लाट रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुंबई महापालिकेकडून लसीकरणावर जोर दिला जाणार आहे. कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी विशेषतः १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातील मुला-मुलींचं लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी मुंबई महानगरात केंद्र सरकारच्या […]
ADVERTISEMENT

मुंबईत पुन्हा एकदा कोरोना डोकं वार काढताना दिसतोय. तज्ज्ञांनी जुलैमध्ये चौथी लाट येण्याचा इशारा दिला असून, आता महापालिकेनं चौथी लाट रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुंबई महापालिकेकडून लसीकरणावर जोर दिला जाणार आहे.
कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी विशेषतः १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातील मुला-मुलींचं लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी मुंबई महानगरात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘हर घर दस्तक’ ही मोहीम १ जूनपासून सुरु करण्यात आली आहे.
३१ जुलैपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. घराजवळच्या कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन पात्र व्यक्तिंनी कोरोना लस घ्यावी, यासाठी नागरिकांना महापालिकेकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेऊन कोरोना लसीकरण गतिमान करण्यासाठी आणि सामाजिक प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात १ जून ते ३१ जुलैपर्यंत ‘हर घर दस्तक मोहीम २’ राबविण्यात येत आहे.
यामध्ये १२ ते १४ वर्ष व १५ ते १७ वयोगटातील सर्व मुलांचं प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासोबतच वृद्धाश्रमातील व इतर वरिष्ठ नागरिक (६० वर्ष व अधिक) यांना प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) देण्याकरिता कार्यवाही केली जाणार आहे.