MCA वर पवार-शेलार पॅनेलचा बोलबाला; अमोल काळेंपाठोपाठ नार्वेकर, आव्हाडही विजयी
मुंबई : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए निवडणुकीचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. या निकालात प्रामुख्यानं पवार-शेलार पॅनेलच वर्चस्व पहायला मिळत आहे. अध्यक्षपदी पवार-शेलार पॅनेलचे उमेदवार अमोल काळे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला. त्यांनी मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार संदीप पाटील यांचा पराभव केला. अमोल काळे यांना १८१ मत मिळाली. तर […]
ADVERTISEMENT
मुंबई : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए निवडणुकीचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. या निकालात प्रामुख्यानं पवार-शेलार पॅनेलच वर्चस्व पहायला मिळत आहे. अध्यक्षपदी पवार-शेलार पॅनेलचे उमेदवार अमोल काळे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला. त्यांनी मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार संदीप पाटील यांचा पराभव केला. अमोल काळे यांना १८१ मत मिळाली. तर संदीप पाटील यांना १५८ मत मिळली. यामुळे पुन्हा एकदा राजकारणी क्रिकेटरवर भारी पडल्याचं चित्र आहे.
याशिवाय सचिव पदावरती पवार-शेलार पॅनेलचे उमेदवार आणि बहुजन विकास आघाडीच्या पंकज ठाकूरांचे जावई अजिंक्य नाईक यांचा दणदणीत विजय झाला. अजिंक्य नाईक यांना तब्बल २८६ मत मिळाली. तर त्यांच्या विरोधातील उमेदवार मयांक खांडवाला यांना ३५ आणि ‘एमसीए’चे माजी अध्यक्ष रवी सावंत यांचे पुत्र नील सावंत यांना अवघी २० मत मिळाली.
सहसचिव या पदासाठी पवार-शेलार पॅनेलचे दीपक पाटील यांच्याविरुद्ध कुणीही उमेदवारी अर्ज केलेला नसल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार झाली. एमसीए’च्या कोषाध्यक्षपदी पवार-शेलार पॅनेलचे अरमान मल्लिक यांनी विजय संपादन केला. त्यांना १६२ मत मिळाली. तर जगदीश आचरेकर यांना १६१ अशी मत मिळाली. आचरेकर यांचा अगदी थोडक्यात पराभव झाला आहे. कोषाध्यक्षपदाचे तिसरे उमेदवार संजीव खानोलकर यांना अवघी १८ मत मिळू शकली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
गव्हर्निंग काऊन्सिल या पदासाठी झालेल्या निवडणुकीत गणेश अय्यर यांनी २१३ मत मिळवत विजय प्राप्त केला. तर त्यांचे विरोधी उमेदवार मलिक मर्चंट यांना १२३ मत मिळाली. सोबतच एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक हेही पवार-शेलार पॅनेलकडून मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत.
नार्वेकर-आव्हाडही विजयी :
याशिवाय या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना (ठाकरे गट) सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलमधून अॅपेक्स काऊंन्सिलपदावर विजयी झाले आहेत. नार्वेकर यांना २२१, आव्हाड यांना १६३ तर निलेश भोसले यांना २१९ मत मिळाली. याचसोबत कौशिक गोडबोले – २०५, अभय हडप – २०५, सुरज सामत – १७०, मंगेश साटम – १५७, संदीप विचारे – १५४, प्रमोद यादव १५२ अशा मताने उमेदवार विजयी झाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT