मुंबई-गोवा महामार्ग १५ तासांपासून ठप्प, टँकर नदीपात्रात उलटल्याने वाहतुकीवर परिणाम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या १५ तासांपासून मुंबई गोवा महामार्ग ठप्प आहे. रत्नागिरीतल्या लांजाजवळ एलपीजी टँकर उलटल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. अपघातग्रस्त टँकरमधील गॅसबाहेर सुरक्षित बाहेर काढल्यानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत होणार आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

कसा झाला अपघात?

गुरूवारी दुपारी ४ च्या च्या दरम्यान भारत पेट्रोलियम कंपनीचा टँकर मुंबई गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने प्रवास करत होता. रत्नागिरीतल्या लांजा या ठिकाणी अंजणारी पुलावरून हा टँकर नदीपात्रात कोसळला. या अपघातग्रस्त टँकरमधून एलपीजी गॅस लिक होतो आहे. त्यामुळे हा टँकर जोपर्यंत सुरक्षित बाहेर काढला जात नाही तोपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक होणार नाही. या सगळ्यामुळे मागच्या १५ तासांपासून अधिक काळ हा महामार्ग ठप्प आहे.

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

टँकरमध्ये गॅस असल्यानं आसपासच्या रहिवासी नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेसंदर्भातील माहिती जिल्हा प्रशासनाकडून आसपासचे रहिवाशी आणि प्रवाशांना देणं गरजेचं होतं. पण जिल्हा प्रशासनाकडून तशी कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही, अशी माहिती नागरिकांकडून मिळत आहे. प्रशासनाकडून गुरूवारपासून एकच दावा सातत्यानं केला जात आहे की, गोवा आणि उरणहून तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल होणार आहे. तज्ज्ञांच्या मदतीनं या अपघातग्रस्त टँकरमधील एलपीजी काढून दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून दावा करण्यात येत असला तरी, यासर्व गोष्टींसाठी एकूण किती कालावधी लागेल हे स्पष्ट सांगितलं जात नाही. तसेच, पथक अद्यार घटनास्थळी दाखल झालेलं नाही.

हे वाचलं का?

अपघातामुळे चालकाचा मृत्यू

या अपघातात उस्मानाबादचे चालक प्रमोद जाधव यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या पथकासह ‘फिनोलेक्स’, ‘जिंदाल’ कंपन्यांची सुरक्षा पथके दाखल झाली आहेत. उंचावरुन नदीपात्रात कोसळल्यामुळे टँकरचे तीन तुकडे झाले आहेत.

टँकरमधून एलपीजी गॅस लीक होत असल्याने जोखीम वाढली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या टँकरमधून एलपीजी गॅस बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञांची टीम गोवा आणि उरणमधून घटनास्थळी दाखल होणार असं सातत्याने सांगितलं जातं आहे.

ADVERTISEMENT

मुंबईहून गोवा महामार्गाने प्रवास करायचा असेल तर पर्यायी मार्ग काय आहेत?

लांजा, शिपोली पालीमार्गे रत्नागिरीकडे जाता येईल

ADVERTISEMENT

देवधे, पुनसर, काजरघाटीमागे रत्नागिरीकडे जाता येईल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT