मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, युवकाला विवस्त्र करून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक
Grinder या गेट चॅटिंग अॅपद्वारे समलैंगिक युवकांशी चॅटिंग करणं, त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतल्या मालवणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी सांगितलं हे Grinder App डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये सगळी माहिती भरावी लागते. या माहितीचा उपयोग करून एका हायप्रोफाईल युवकाला जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या हायप्रोफाईल […]
ADVERTISEMENT

Grinder या गेट चॅटिंग अॅपद्वारे समलैंगिक युवकांशी चॅटिंग करणं, त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतल्या मालवणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी सांगितलं हे Grinder App डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये सगळी माहिती भरावी लागते. या माहितीचा उपयोग करून एका हायप्रोफाईल युवकाला जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
या हायप्रोफाईल युवकाला App चा उपयोग करून बोलवण्यात आलं. तिथे पाच जणांनी त्याच्यासोबत संबंध ठेवण्याची मागणी केली. त्याने नकार दिल्यानंतर त्याला मारहाण करून लुटण्यात आलं. या युवकाने या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार केली. ज्यानंतर पोलिसांनी पाचपैकी तिघांना अटक केली आहे.
या अॅपमध्ये माहिती कोणत्या भागातल्या माणसाने भरली आहे ते समजतं. लोकेशन कळल्यानंतर समलैंगिक असणारे युवक एकमेकांशी या App मार्फत जोडले जातात. आधी या अॅपद्वारे चॅटिंग करतात त्यानंतर यांच्यात अनैतिक संबंधही प्रस्थापित होतात असं पोलिसांनी सांगितलं. याच प्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बायकोचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ What’s App स्टेटसवर, पतीविरुद्ध गुन्हा दाखल