कुख्यात गुंड रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना मिळणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कुख्यात गँगस्टर रवी पुजारीची कस्टडी मिळवण्यात मुंबई पोलिसांना अखेरीस यश आलेलं आहे. बंगळुरु येखील कोर्टाने रवी पुजारीचा ताबा आता मुंबई पोलिसांकडे देण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात रवी पुजारीला सेनेगलवरुन भारतात आणण्यामध्ये सरकारी यंत्रणांना यश आलं होतं. मुंबईत रवी पुजारीविरोधात तब्बल ४९ गुन्ह्यांची नोंद आहे. २०१६ साली मुंबईतील विलेपार्ले येथील गजाली रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी पुजारीची कस्टडी क्राईम ब्रांचला मिळाली आहे.

ADVERTISEMENT

क्राईम ब्रांचमधील सुत्रांनी मुंबई तक च्या प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन-तीन दिवसांमध्ये रवी पुजारीला मुंबईत आणलं जाणार आहे. २०१६ साली विलेपार्ले येथील गजाली रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारप्रकरणात मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ७ जणांना अटक केली होती. मुंबईतील मोठे हॉटेलमालक, उद्योगपती यांच्याकडून खंडणी मागण्याचं काम रवी पुजारीची टोळी करत होती. याप्रकरणात रवी पुजारीचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई पोलीस प्रयत्नशील होती. यानंतर जवळपास वर्षभर चाललेल्या न्यायालयीन लढाईनंतर अखेरीस कर्नाटकमधील कोर्टाने रवी पुजारीची कस्टडी मुंबई पोलिसांना सोपवली आहे.

खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांचं एक पथक रवी पुजारीला मुंबईत घेऊन येणार आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर रवी पुजारीला मोक्का कोर्टापुढे हजर करण्यात येईल अशी माहिती गुन्हे शाखेचे सह आयुक्त मिलींद भारंबे यांनी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT