मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा प्रवास महागणार, टोलमध्ये १८ टक्के वाढ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई पुणे एक्प्रेस वे चा प्रवास महाग होणार आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे टोलमध्ये ङोणारी १८ टक्के वाढ. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गावरच्या टोलमध्ये लवकरच वाड होणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना जास्त टोल भरावा लागणार आहे. कारण १ एप्रिल २०२३ पासून या टोलमध्ये १८ टक्के वाढ होणार आहे.

दर तीन वर्षांनी १८ टक्के टोलवाढ

२००४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई पुणे एक्स्प्रेस वे च्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी १८ टक्के वाढ केली जाईल अशी सूचना काढण्यात आली होती. याआधी १ एप्रिल २०२० पासून टोल वाढला होता. आथा २०२३ च्या १ एप्रिलपासून टोल पुन्हा वाढणार आहे. १ एप्रिल २०२३ ला लागू होणारे टोलचे दर २०३० पर्यंत कायम असतील असं एमएसआरडीसीने सांगितलं आहे.

१ एप्रिल २०२३ पासून टोल किती वाढणार?

वाहन सध्याचे दर १ एप्रिल २०२३ पासूनचे दर

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कार २७० रूपये ३२० रूपये

टेम्पो ४२० रूपये ४९५ रूपये

ADVERTISEMENT

ट्रक ५८० रूपये ६८५ रूपये

ADVERTISEMENT

बस ७९७ रूपये ९४० रूपये

थ्री एक्सेल १३८०रूपये १६३० रूपये

एम एक्सेल १८३५ रूपये २१६५ रूपये

गेल्या महिन्यात विनायक मेटेंचा अपघात

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे हा या दोन शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग जलदगतीने मुंबईहून पुण्यात आणि पुण्याहून मुंबईत पोहचण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. अशात या मार्गावर अनेक अपघातही होतात. मागच्याच महिन्यात या रस्त्यावर शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची चर्चा झाली होती.

ITMS म्हणजेच इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम लागू करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. या सिस्टिममुळे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होणार आहे. या प्रणालीत ड्रोनचा वापरही करण्यात येईल. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहचवण्यासाटी नजर ठेवली जाणार आहे. रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरांचं जाळं असणार आहे. लेन कटिंग केल्यास त्याची नोंदही केली जाणार आहे. मुंबई पुणे एक्प्रेस वेवरचा प्रवास महाग होणार आहे. टोल वाढणार असल्याने त्याचा फटका वाहनधारकांना बसणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT