मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी कोणते रस्ते सुरू, कोणते बंद जाणून घ्या!
मुंबई : शनिवारचा दिवस मुंबईकरांसाठी आंदोलन आणि मोर्चांचा दिवस ठरणार आहे. आज महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर त्याचवेळी भाजपकडूनही माफी मांगो आंदोनल करण्यात येणार आहे. या आंदोनल आणि मोर्चांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतली वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. दक्षिण विभागाचे वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त गौरव सिंह यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. […]
ADVERTISEMENT

मुंबई : शनिवारचा दिवस मुंबईकरांसाठी आंदोलन आणि मोर्चांचा दिवस ठरणार आहे. आज महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर त्याचवेळी भाजपकडूनही माफी मांगो आंदोनल करण्यात येणार आहे. या आंदोनल आणि मोर्चांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतली वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. दक्षिण विभागाचे वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त गौरव सिंह यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
काय आहे वाहतूक व्यवस्थेतील बदल?
रिचर्डसन्स कुद्रास मिल, सर जे. जे. उड्डाणपुल, डॉ. दादाभाई नौरोजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, टाईम्स ऑफ इंडिया इमारत इकडे जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या इच्छीत स्थळी पोहचण्याकरीता ‘खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा’ असं आवाहन करण्यात आलं आहे.
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी गॅस कंपनी – चिंचपोकळी पुलावरून ऑर्थर रोड – सात रस्ता सर्कल – मुंबई सेंट्रल – डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग (लॅमिण्टन रोड ) – ओपेरा हाऊस – महर्षी कर्वे रोडचा (क्वीन्स रोड) वापर करावा.
किंवा