Mumbai Unlock : मुंबईतली मंदिरंही 7 ऑक्टोबरपासून होणार खुली; BMC ने जाहीर केली नियमावली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतली मंदिरंही नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे महाराष्ट्रातली मंदिरं बंद होती. महाराष्ट्रात मंदिरं सुरू केली जाणार आहेत. आता मुंबईतही मंदिरं सुरू केली जाणार आहेत. त्यासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळं एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास संमती देण्यात आली आहे. याआधी राज्यातली मंदिरं आणि सगळी धार्मिक स्थळं सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

राज्यात मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोरोनच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता तिसऱ्या संभाव्य कोरोनाच्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केलं आहे. हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत आपण निर्बंध शिथील करत आहोत. सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत उतार येत असला तरीही आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. धार्मिक स्थळं भक्तांसाठी खुली केली असती तरी त्या ठिकाणी आरोग्याच्या नियमांचं पालन झालं पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशक वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये असंही सरकारने म्हटलं आहे.

Big News! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्व मंदिरं, धार्मिक स्थळं खुली होणार!

ADVERTISEMENT

मंदिरं, धार्मिक स्थळांबाबत महत्त्वाचे नियम काय?

ADVERTISEMENT

मंदिरं, धार्मिक स्थळं त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्के भक्तसंख्येच्या उपस्थितीत सुरू करण्यात येणार आहेत.

मंदिरात प्रवेश करताना हात सॅनेटाईझ करणे, स्वच्छ धुणे आवश्यक

मंदिरात प्रवेश करण्याआधी तापमान घेतलं जाणं आवश्यक

मंदिरात गर्दी होणार नाही याची काळजी मंदिर व्यवस्थापनाने घेणं आवश्यक

मंदिरं किंवा धार्मिक स्थळांवर सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक

दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मास्क लावणे बंधनकारक

येत्या काही दिवसांमध्ये नवरात्र उत्सवही सुरू होतो आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवरही सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गणेश उत्सवा प्रमाणेच सार्वजनिक नवरात्र उत्सवही साधेपणाने साजरा करण्यासाठीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

काय आहेत नवरात्र उत्सवासाठीच्या सूचना

1) सार्वजनिक नवरात्र उत्सवासाठी नवरात्र उत्सव मंडळांना मुंबई महापालिकेची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाईन परवानगी यंत्रणा तयार करून ती 23 सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. ही संमती विनाशुल्क देण्यात येणार आहे.

2) कोव्हिड 19 या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आणि मनपाचे धोरण लक्षात घेता मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित आहे. घरगुती आणि सार्वजनिकरित्या स्थापन करण्यात येणाऱ्या देवीच्या मूर्तींची सजावट करताना भपकेबाजी नसावी.

3) देवींची मूर्ती सार्वजनिक मंडळांसाठी चार फुटांपेक्षा जास्त आणि घरगुती मूर्तींसाठी 2 फुटांपेक्षा जास्त नसावी.

4) या वर्षी पारंपरिक देवमूर्तीची किंवा घरातील धातू किंवा संगमरवर आदी मूर्तींचे पूजन केलं जावं. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरच्या घरी करण्यात यावं. ते शक्य नसल्यास नैसर्गिक विसर्जनस्थळी विसर्जन करावं.

5) घरगुती देवमूर्तींचं आगमन हे विसर्जन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत जास्त पाच व्यक्तींचा समूह असावा. जे उपस्थित असतील त्यांनी मास्क, फेस शिल्ड लावलेलं असावं. तसंच शक्यतो या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असावेत.

6) सार्वजनिक देवमूर्तींच्या आगमनाच्या वेळी किंवा विसर्जनाच्या वेळी 10 पेक्षा जास्त लोक असणार नाहीत. या सगळ्यांनीही कोरोना प्रतिबंधांचे उपाय अवलंबले पाहिजेत.

7) नवरात्र उत्सवाच्या दरम्यान गरबा, दांडिया याचे आयोजन करू नये. आरती, भजन, किर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसंच कोव्हिड 19 च्या अनुषंगाने लॉकडाऊन शिथील करण्यातील प्रचलित आदेशांचा भंग होणार नाही याची खबरदारी घेतली जावी.

8) गरबा/सांस्कृति कार्यक्रमांच्या ऐवजी आरोग्य विषयक उपक्रम जसे की रक्तदान शिबीरं किंवा इतर सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करावं. कोरोना, डेंग्यू, मलेरिया इत्यादी प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छता याबाबत जनजागृती केली जावी.

9) शक्यतो देवीच्या मूर्तीचं दर्शनाची ऑनलाईन सुविधा करण्यात यावी. केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

10) ज्या मंडपात देवी बसली आहे त्या ठिकाणी निर्जुंतीकरण तसंच थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात यावी प्रत्यक्ष दर्शन घेणाऱ्या भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे. तसंच स्वच्छतेचे नियम पाळण्यात यावेत.

11) मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावं तसंच कार्यकर्ते आणि इतर व्यक्ती यांच्या वापरासाठी सॅनेटायझर्स ठेवले जावेत. तसंच कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम पाळण्यात यावेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT