मुंबईत नव्या गाईडलाईन्स, सोमवारपासून काय होणार Unlock जाणून घ्या
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरूवात झाली आहे. वाढलेला रिकव्हरी रेट आणि कमी झालेली पॉझिटिव्ह रूग्णांची तसंच सक्रिय रूग्णांची संख्या हेच सांगते आहे. अशात राज्य शासनाने Unlock चा निर्णय घेतला. शासनाच्या ब्रेक द चेनच्या आदेशानुसार मुंबई तिसऱ्या श्रेणीत येत असल्याने त्यानुसार नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यावेळी शहरातील विविध गोष्टींना संमती देण्यात आली असली […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरूवात झाली आहे. वाढलेला रिकव्हरी रेट आणि कमी झालेली पॉझिटिव्ह रूग्णांची तसंच सक्रिय रूग्णांची संख्या हेच सांगते आहे. अशात राज्य शासनाने Unlock चा निर्णय घेतला. शासनाच्या ब्रेक द चेनच्या आदेशानुसार मुंबई तिसऱ्या श्रेणीत येत असल्याने त्यानुसार नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यावेळी शहरातील विविध गोष्टींना संमती देण्यात आली असली तरीही सामान्यांसाठी मुंबई लोकल बंदच राहणार आहे. अनलॉकचे नवे नियम ७ जून म्हणजेच सोमवारपासून लागू होतील.
मुंबई लोकल येत्या काही दिवासंमध्येही फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच सुरू राहणार आहे. नव्या आदेशांमध्ये Women हा शब्द वगळण्यात आला आहे. शहर अनलॉक करण्याच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या लेव्हलवर आहे त्यामुळे सोमवारपासून सरसकट सगळे निर्बंध उठवले जाणार नाहीत.
मुंबईत काय काय सुरू होणार जाणून घेऊ..
नागरिकांना पहाटे 5 ते सकाळी 9 या वेळेत मॉर्निंग वॉक, सायकलिंग करण्यास संमती देण्यात आली आहे










