लाज वाटतेय ‘भारताची लेक’ म्हणून घ्यायची; रिलेशनशिपच्या चर्चांवर मुनमुन दत्ता संतापली
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत बबिताजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. मुनमुन दत्ता मालिकेत टप्पूची भूमिका करणाऱ्या अभिनेता राज अनादकतच्या रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. मात्र, यावर मौन सोडत मुनमुन दत्ताने संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ताने राज अनादकतसोबत रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपला संताप […]
ADVERTISEMENT
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत बबिताजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. मुनमुन दत्ता मालिकेत टप्पूची भूमिका करणाऱ्या अभिनेता राज अनादकतच्या रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. मात्र, यावर मौन सोडत मुनमुन दत्ताने संताप व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
अभिनेत्री मुनमुन दत्ताने राज अनादकतसोबत रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय, अशा शब्दात तिने आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
मुनमुन दत्ता काय म्हणाली?
हे वाचलं का?
‘मीडिया आणि शून्य विश्वासार्हता असलेल्या पत्रकार… कपोलकल्पित गोष्टी बनवून कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्यात, तिच्या समंतीशिवाय डोकावण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला आहे? तुमच्या अशा वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या प्रतिमेला जो तडा जातो त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात का? तुम्ही टीआरपीसाठी ज्या महिलेलाही सोडत नाहीत, जिने काही वेळापूर्वी आपला मुलगा गमावला आहे.’
‘खळबळजनक बातम्यांसाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकता. पण, तुमच्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या संकाटाची तुम्ही जबाबदारी घेण्यासाठी तयार आहात का, नसाल, तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटली पाहिजे’, असं मुनमुन दत्ताने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
दुसऱ्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
ADVERTISEMENT
मुनमुन दत्ताने दोन पोस्ट लिहिल्या आहेत. ही पोस्ट तिने चाहत्यांना आणि नागरिकांना उद्देशून लिहिली आहे. ‘मला तुमच्या चांगल्या अपेक्षा होत्या, पण सुशिक्षित लोक ज्या प्रकारे टीका टिप्पणी करत आहेत; त्यावरून लक्षात येतंय की समाज म्हणून आपण किती मागासलेलो आहोत.’
‘स्त्रीवर सातत्याने तिच्या वयावरुन आणि इतर गोष्टीवरुन प्रत्येकाकडून कमेंट केल्या जातात. आपल्या कमेंटवरुन एखाद्याला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे याची कुणाला चिंता नाही. एखाद्याचं १३ वर्षांचं करियर अवघ्या १३ मिनिटांत धुळीस मिळवलं जातं. त्यामुळे एखादा व्यक्ती नैराश्यात गेला किंवा आपले जीवन संपवण्याचा विचार करत असेल तर तुम्ही थोडं थांबा आणि विचार करा की आपल्यामुळेच ही परिस्थिती ओढावली असेल का. आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय’, असं मुनमुन दत्ताने दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT