सोलापूर : नगरपरिषदेच्या राजकारणातून NCP कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नगरपरिषदेच्या स्थानिक राजकारणातून निर्माण झालेल्या वैमनस्यामुळे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या केली आहे. बुधवारी रात्री उशीरा शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली. सतीश क्षीरसागर असं मृत शिवसैनिकाचं नाव असून या हल्ल्यात त्याचा साथीदार विजय सरवदे हा जखमी झाला आहे.

ADVERTISEMENT

आपल्या बाईकवरुन घरी जात असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी क्षीरसागरला टेम्पोतून धडक दिली, याच अपघातात क्षीरसागर यांना आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप घरच्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष सुरवसे, रोहित फडतरे, पिंटू सुरवसे, टेम्पो चालक भैय्या अस्वले यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. चार आरोपींपैकी टेम्पो चालक अस्वलेला पोलिसांनी अटक केली आहे.

चार महिन्यापूर्वी शहरातील प्रभाग क्रमांक ८ आणि ९ मध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याच्या कारणावरुन सिद्धार्थ नगर येथील शिवसेना कार्यकर्ते सतीश क्षीरसागर आणि विजय सरवदे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरुन सुनावणीदरम्यान प्रांताधिकाऱ्यांनी नावं कमी केली होती. याचाच राग आरोपींच्या मनात होता. याच रागातून आरोपींनी आपल्या भावाची हत्या घडवून आणल्याची तक्रार क्षीरसागर यांच्या भावाने पोलिसांत दाखल केली आहे. दरम्यान पोलीस उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT