हिंदू तरुणीची मुस्लीम पतीकडून धारदार शस्त्रानं हत्या, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईतील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा चाकूने वार करून निर्घृण खून केल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर लगेचच आरोपीला ताब्यात घेण्यात आले, मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 3 वर्षांपूर्वी मोहम्मद इक्बाल शेख याने मृत रुपालीशी विवाह केला, लग्नानंतर काही दिवसांनी आरोपी इक्बालचे कुटुंबीय एकत्र राहायला आले आणि रुपालीवर मुस्लिम रितीरिवाज पाळण्यासाठी, बुरखा घालण्यासाठी दबाव टाकू लागले, पण रुपालीने त्यांचे ऐकले नाही, यावरून अनेकदा कुटुंबात भांडणे होत असत.

ADVERTISEMENT

नवरा-बायकोतील वाद विकोपाला गेला अन्…

रुपालीला मुलगाही झाला त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाले, त्यानंतर रुपाली वेगळी राहू लागली. पती-पत्नीमध्ये फोनवर बोलणे होत असे, मात्र मुस्लिम प्रथा पाळण्यावरून भांडणं होत असत. सोमवारी आरोपी इक्बालने रुपालीला भेटायला बोलावले. रुपालीने इक्बालला घटस्फोट देण्यास सांगितले, त्यावर इक्बालने मुलाचा हवाला देत घटस्फोट न देण्याचे बोलले, त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर हाणामारी झाली, त्यानंतर इक्बालने पत्नी रुपालीला जवळच्या रस्त्यावर ओढत नेऊन तिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला.

मुस्लिम रितीरिवाज पाळण्याचा होता दबाव

गंभीर जखमी रुपालीचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला, पोलीस येण्यापूर्वीच आरोपी फरार झाला. मात्र, घटनेनंतर काही वेळातच टिळक नगर पोलिसांनी आरोपी इक्बालला ताब्यात घेतलं. इक्बालचं रुपालीच्या आधी एक लग्न झालं होतं पण मुलबाळ नसल्यामुळे इक्बालने तिला घटस्फोट दिला होता, त्यानंतर इक्बालने हिंदू धर्म स्वीकारला. तरुणाने रुपालीशी लग्न केलं आणि त्यानंतर मुस्लिम रितीरिवाज पाळण्याचा दबाव सुरू केला. मात्र पोलिसांनी आरोपी इक्बालविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे, तर मृताच्या नातेवाईकांनी त्याच्यावर मुस्लिम प्रथा पाळण्याचा दबाव असल्याचा आरोप केला आहे.

हे वाचलं का?

आरोपीला 24 तासात घेतलं ताब्यात, पुढील तपास सुरु

पोलीस निरीक्षक टिळक नगर यांनी सांगितले की, सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी इक्बाल शेख याने त्याच्या 23 वर्षीय पत्नीवर चाकूने अमानुष वार केले, मृताच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की इक्बाल मुस्लिम आणि रुपाली हे हिंदू होते. त्यामुळे इक्बाल आणि त्याचे कुटुंबीय रुपालीवर मुस्लिम प्रथा स्वीकारण्यासाठी, बुरखा घालण्यासाठी दबाव टाकत होते, या आरोपात किती तथ्य आहे, याचा तपास सुरू असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT