Murlidhar Jadhav : “गोळी घातली की…”, ठाकरेंचा नेता ढसाढसा रडला, काय घडलं?

भागवत हिरेकर

murlidhar jadhav : पक्षाकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर मुरलीधर जाधवांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. सुजित मिंचेकर यांच्यावर गंभीर आरोप केले.

ADVERTISEMENT

Murlidhar Jadhav cry in press conference, Attack On Sushma Andhare And Sujit Minchekar
Murlidhar Jadhav cry in press conference, Attack On Sushma Andhare And Sujit Minchekar
social share
google news

Murlidhar Jadhav Uddhav Thackeray : राजू शेट्टींवर टीका करत मुरलीधर जाधवांनी हातकंणगले लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. त्याच्या दोन दिवसानंतरच त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं. पक्षाकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर मुरलीधर जाधवांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. सुजित मिंचेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याचबरोबर घडलेला घटनाक्रम सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

मुरलीधर जाधव यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर कोल्हापुरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांची भूमिका मांडण्याबरोबरच पडद्यामागील राजकारणाबद्दल खुलासा केला.

मुरलीधर जाधव पत्रकार परिषदेत काय बोललो?

जाधव म्हणाले, “माझं म्हणणं एवढंच होतं की, पक्षासाठी झीज करणारा… 19 वर्षे मी जिल्हाप्रमुख आहे. 3 वर्षे मी हातकंणगले तालुकाप्रमुख म्हणून काम केलं. 5 वर्ष उपरीचा शहरप्रमुख काम केलं. अंगावर प्रसंगी चाकूचे वार घेतलेले आहेत. पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आहेत. मला का वाटू नये की, मी पक्षासाठी उभं राहिलं पाहिजे”, अशा भावना मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >> ‘कानशिलात कशी मारतात माहितीए ना..’, भाजप आमदाराची उर्मट भाषा

“निर्णय निवडणुकीला गेला. येईल न येईल हा भाग गौण आहे. पण, जी तुमच्याबरोबर तुम्ही उभी केली, ती किती आपल्याबरोबर राहिली? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मी राजू शेट्टींना विरोध एवढ्यासाठीच केलाय की, 2014 ला महायुतीतून त्यांना निवडून दिलं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती फिस्कटली. अशा वेळेला राजू शेट्टींचा हात उद्धव ठाकरेंनी ओढून धरला होता. जाऊ नका म्हणाले. त्यावेळी सदाभाऊ खोत आणि ते होते. मी या घटनेचा साक्षीदार आहे. त्यावेळी राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले. माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील”, असे सांगताना मुरलीधर जाधवांच्या अश्रुंचा बांध फुटला.

हे वाचलं का?

    follow whatsapp