इरफानला अडकवलं जातं आहे, बेकायदा धर्मांतर प्रकरणी इरफानच्या भावाची प्रतिक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इरफान शेख हा अतिशय चांगला मुलगा आहे. तो दिल्लीत सरकारी नोकर होता. त्याला फसवलं जातं आहे त्याला नाहक या प्रकरणात गोवलं जातं आहे असं आता इरफान शेखच्या भावाने म्हटलं आहे. सिरसाळा येथे वास्तव्य करणाऱ्या फुरखान शेखने जो इरफान शेखचा मोठा भाऊ आहे त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर तो दिल्लीत चांगलं काम करत होता. त्याच्याशी महिन्याभरापूर्वी संपर्क झाला होता. आता त्याला धर्मांतर प्रकरणात अटक झाली आहे. मात्र यामध्ये त्याच्याशी बोलावं लागेल. मला खात्री आहे तो असं काही करू शकत नाही असं फुरखान शेखने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

इरफानच्या मामानेही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. अहमदाबाद येथील आयोजीत विद्यालयात कार्यक्रमास आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी सिरसाळा गावचे भूमीपुत्र माझे लहान भाऊ इरफान. पठाण यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल व्यासपीठावर स्वता नरेंद्र मोदी यांनी कौतुक करत शाबासकी दिली. यामुळे आम्हाला इरफान भाईचा अभिमान वाटतो असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. अवैध धर्मांतरण प्रकरणांमध्ये इरफानचं नाव आल्यामुळे परिवाराला धक्का बसला आहे इरफान असं करू शकत नाही असं त्यांच्या मामांना वाटतय मात्र बोलण्यास नकार दिला असून याची माहिती घेऊन बोलू अस त्यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

हे वाचलं का?

उत्तर प्रदेशात बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन मौलवींना अटक केली. या मौलवींनी हजारो हिंदूंचं धर्मांतर केल्याचा आरोप आहे. खोटी माहिती देत अनेक हिंदु मुला-मुलींना इस्लाम स्विकारायला लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आता याप्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शनही उघडकीस आलं असून पोलिसांनी बीडमधील इरफान शेख नावाच्या व्यक्तीला एटीएसने अटक केली आहे. इरफान हा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातल्या शिरसाळा गावातला रहिवासी आहे.

इरफान शेख हा केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाचा कर्मचारी असल्याचं समोर येतंय. या विभागात इरफान इंटरप्रिटेटर म्हणून काम करत होता. दिल्लीत वास्तव्यास असलेल्या इरफानला उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतलंय. इरफानचं प्राथमिक शिक्षण हे शिरसाळ्यात झालं. यानंतर तो प्रोफेसर म्हणून दिल्लीत काम करत असल्याची माहिती त्याच्या घरच्यांनी दिली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT