नागपूर हादरलं! मित्रानेच केला घात; 17 वर्षीय मुलीवर सात जणांनी केला बलात्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सामूहिक बलात्काराच्या घटनेनं शुक्रवारी नागपूर शहर हादरलं. नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली, तर तीन संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेमुळे नागपूर शहरात नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागला आहे. (Nagpur : A minor girl has been raped by seven accused)

नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील इससानी मिहान मार्गावर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं. अल्पवयीन मुलगी मित्रासोबत फिरायला गेली होती. तिथे अचानक पोहोचलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी मित्राला मारहाण केली. त्यानंतर पीडितेवर सामूहिक बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसांकडे आली होती.

मुंबईतील NCB अधिकाऱ्याला महिलेची छेड काढल्याप्रकरणी अटक

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रकरणाचा तपास करत असताना मुलीच्या मित्रानेच पैसे घेऊन मुलांना बोलावल्याचं उघडकीस आलं. तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू असताना काल ही घटना घडली. यात सामूहिक बलात्कार प्रकरणात एकूण सात आरोपी असून, यात मुलीच्या मित्रासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. तिघांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली असून, तिची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात आलं.

साताऱ्यात एकाची दगडाने ठेचून हत्या; रस्त्यात अडवून टोळक्यानं केला हल्ला

ADVERTISEMENT

नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी या प्रकरणाबद्दल अधिकची माहिती दिली. अल्पवयीन मुलगी मित्रासोबत फिरायला गेली होती. मात्र मित्राने काही तरुणांकडून पैसे घेऊन त्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतलं असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे. घटनेचा पेच वाढला असून, या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड मुलीचा मित्र असल्याचं पुढे येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT