नागपूर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, गेल्या 24 तासात सापडले प्रचंड रुग्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर: Nagpur Corona Situation: पुण्यापाठोपाठ आता नागपूरमध्ये (Nagpur) देखील कोरोनाची (Corona) परिस्थिती ही अत्यंत गंभीर होत चालली आहे. कारण गेल्या काही दिवसात नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. याशिवाय सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे येथील मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढत आहे. नागपूरमध्ये सध्या तिसरा लॉकडाऊन (Lockdown) सुरु आहे. असं असून देखील येथील रुग्णांची संख्या काही अटोक्यात आलेली नाही. याउलट येथील रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याचं दिसतं आहे.

मागील 24 तासात नागपूर जिल्ह्यात तब्बल 7907 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आले आहेत. त्यापैकी 4720 हे नागपूर जिल्ह्यातील शहरी भागातील रुग्ण आहेत. तर 3040 रुग्ण हे ग्रामीण भागात सापडले आहेत. पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये देखील कोरोनाची संसर्ग अत्यंत वेगाने होत आहे. त्यामुळे नागपूर हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट (corona new hotspot) बनला आहे. दरम्यान, नागपूरमध्ये काल एका दिवसात 5130 रुग्ण हे बरे होऊन घरी देखील परतले आहेत.

नागपूरकरांच्या दृष्टीने सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे कोरोना रुग्णांचे वाढते मृत्यू. कारण गेल्या 24 तासात नागपूर जिल्ह्यात तब्बल 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 6936 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

धक्कादायक! मृतदेहाजवळ जाऊन इतर रूग्णांना उपचार देण्याची डॉक्टरांवर आली वेळ

दरम्यान, नागपूरकरांसाठी आणखी एक चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे येथील अॅक्टिव्ह रुग्णांची वाढती संख्या. सध्या नागपूरमध्ये 80624 एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात पुण्यानंतर आता अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत नागपूर हा क्रमांक दोनचा जिल्हा ठरला आहे. कारण येथील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही 80 हजारांच्या देखील पुढे आहे. त्यामुळे नागपूरमधील आरोग्य सेवा अक्षरश: व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र पाहायला मिळात आहे. याबाबत मुंबई तकने केलेल्या ग्राऊंड रिपोर्ट्नंतर भीषण वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे नागपूरकरांची परिस्थिती ही अत्यंत गंभीर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. (nagpur is becoming coronas new hotspot huge number of patients found in last 24 hours)

ADVERTISEMENT

राज्यातील कोरोना रुग्णांची नेमकी आकडेवारी:

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents) पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रुग्ण सापडेल आहेत. मागील काही दिवसांपासून दररोज 65 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. राज्यात सध्या लॉकडाऊन लागू असून देखील गेल्या 24 तासात तब्बल 66,191 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य सेवेवरील ताण हा सतत वाढत आहे.

Lockdown मध्ये विनामास्क क्रिकेट खेळणं पडलं महागात, कोर्टाने तरुणाला जामिन नाकारला

याशिवाय आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतांचा आकडा (Deaths) बराच वाढला आहे. कारण मागील 24 तासात राज्यात एकूण 832 कोरोना रुग्ण दगावले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुण्यात दिवसभरात 8 हजारांच्या जवळपास नवे रूग्ण सापडले

पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 7907 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 4631 हे फक्त पुणे शहरातील रुग्ण आहेत. तर नवे रुग्ण ज्या वेगाने सापडत आहेत त्या तुलनेत पुण्यात रुग्ण बरे होण्याचा वेग काहीसा कमी आहे. काल 4759 रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, पुण्यात काल एक दिवसात 62 रुग्ण दगावले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT