डिजीटल करन्सीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणुक; मोस्ट वाँटेड निषीद वासनिक अटकेत
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी डिजीटल करन्सीमध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवून गुंतवणुकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या निषीद वासनिकला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. लोणावळा येथे नागपूर पोलिसांनी एक धडक कारवाई करत मोस्ट वाँटेड आरोपी वासनिकला मुद्देमालासह अटक केल्याचं कळतंय. निषीद वासनिकने आतापर्यंत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश अशा अनेक ठिकाणी गुंतवणुकदारांना गंडा घातल्याचं कळतंय. इतकच नव्हे तर आपल्या […]
ADVERTISEMENT
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
डिजीटल करन्सीमध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवून गुंतवणुकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या निषीद वासनिकला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. लोणावळा येथे नागपूर पोलिसांनी एक धडक कारवाई करत मोस्ट वाँटेड आरोपी वासनिकला मुद्देमालासह अटक केल्याचं कळतंय.
निषीद वासनिकने आतापर्यंत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश अशा अनेक ठिकाणी गुंतवणुकदारांना गंडा घातल्याचं कळतंय. इतकच नव्हे तर आपल्या साथीदाराची हत्या करुन फरार झाल्याचा गुन्हाही निषीदवर नागपूरमध्ये दाखल करण्यात आला आहे. इथर ट्रेंड एशिया या संस्थेच्या नावाखाली सेमिनार आयोजित करुन निषीद डिजीटल करन्सीमध्ये गुंतवणूक करुन चौपट मोबदला देण्याचं आश्वासन गुंतवणुकदारांना द्यायचा.
हे वाचलं का?
पुणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने केलेल्या कारवाईत नागपूर पोलिसांनी घटनास्थळावरुन चार अलिशान चारचाकी गाड्या, एक पिस्तुल आणि काडतुसं, सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मार्च २०२१ पासून फरार असलेल्या निषीदचा शोध नागपूर पोलीस घेत होते. आपल्या खबऱ्यांमार्फत नागपूर पोलिसांना निषीद आपल्या मित्र परिवारासह लोणावळ्यातील एका फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती कळाली. ज्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत निषीदसह त्याची पत्नी आणि एका साथीदाराला अटक केली आहे.
अहमदनगर : सैन्य भरतीच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्याला तोतयाला अटक
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT