नागपूरात ओमिक्रॉनचा शिरकाव! दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या नागरिकाचा रिपोर्ट आला ‘पॉझिटिव्ह’
–योगेश पांडे, नागपूर राज्यातील वेगवेगळ्या शहरात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येताना दिसत आहे. मुंबई, पुणे, डोंबिवली, पिंपरी चिंचवडनंतर आता ओमिक्रॉनने राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही चंचुप्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या नागरिकाला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाला असल्याचं रविवारी निष्पन्न झालं. नागपूर महापालिकेच्या आयुक्तांनी याबद्दलची माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन […]
ADVERTISEMENT
–योगेश पांडे, नागपूर
राज्यातील वेगवेगळ्या शहरात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येताना दिसत आहे. मुंबई, पुणे, डोंबिवली, पिंपरी चिंचवडनंतर आता ओमिक्रॉनने राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही चंचुप्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या नागरिकाला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाला असल्याचं रविवारी निष्पन्न झालं. नागपूर महापालिकेच्या आयुक्तांनी याबद्दलची माहिती दिली.
दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन आता महाराष्ट्रातही हळूहळू हातपाय पसरताना दिसत आहे. मुंबई, पुणे आणि डोंबिवली आढळून आलेले ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले असले, तरी दिवसेंदिवस एकूण रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. आता नागपूरमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आला आहे. नागपूरमधील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या पहिलाच रुग्ण आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Omicron : हाच ट्रेंड दुसरी लाट येण्यापूर्वी दिसला; ‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर केंद्राचा इशारा
ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला हा रुग्ण काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून नागपुरात परतला होता. नागपुरात परतल्यानंतर केंद्राने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यात ही व्यक्ती कोरोना पॉझिटव्ह असल्याचं निदान झालं होतं. रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर नमुने जिनोम सिक्वेन्सिगसाठी पाठवण्यात आले होते.
ADVERTISEMENT
या रुग्णाच्या जिनोम सिक्वेन्सिगचे रिपोर्ट आले असून, त्यात या रुग्णाला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाला असल्याचं निप्षन्न झालं, अशी माहिती नागपूर महापालिकेचे आयुक्त बी. राधाकृष्णन यांनी दिली.
ADVERTISEMENT
Booster dose: बुस्टर डोज कधी घेता येणार?; ‘आयसीएमआर’ने संसदीय समितीला दिली माहिती
विमानतळावरच कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर रुग्णाला विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलं होतं. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
या रुग्णाचं वय 40 वर्ष असून, रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाच्या कुटु्ंबीयांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. दरम्यान, नागपूरमध्ये आढळून आलेल्या रुग्णामुळे राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली आहेत.
ADVERTISEMENT