चोर आले रे… अफवेनं उडवलीये शहरवासियांची झोप! लोकांना करावं लागतंय रात्रभर जागरण
चोर आल्याच्या एका अफवेनं नांदेड जिल्ह्यातील लोहा शहराची झोप उडवली आहे. लोहा शहरात सध्या रात्री चोर येत असल्याच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, शहरवासियांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागत आहे. नागरिकांबरोबरच पोलिसांची देखील या अफवेने झोप उडवली आहे. मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या नांदेडमधील लोहा शहरात मागील काही दिवसांपासुन लोकांची झोप उडाली आहे. लोकांच्या जागरणाला कारणीभूत […]
ADVERTISEMENT

चोर आल्याच्या एका अफवेनं नांदेड जिल्ह्यातील लोहा शहराची झोप उडवली आहे. लोहा शहरात सध्या रात्री चोर येत असल्याच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, शहरवासियांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागत आहे. नागरिकांबरोबरच पोलिसांची देखील या अफवेने झोप उडवली आहे.
मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या नांदेडमधील लोहा शहरात मागील काही दिवसांपासुन लोकांची झोप उडाली आहे. लोकांच्या जागरणाला कारणीभूत ठरली आहे एक अफवा. अफवा आहे, शहरात चोर आल्याची!
भयंकर! माथेरानमध्ये सापडला महिलेचा शिर नसलेला मृतदेह
ही अफवा पसरण्यामागे कारण ठरलं आहे, चोरीच्या वाढत्या घटनांचं. शहरात मागील काही महिन्यांपासून चोऱ्याचं प्रमाण वाढलं आहे. चोरीच्या या घटनांनी चोर आल्याच्या अफवांना खतपाणी घातलं असून, अफवेचा विषय चांगलाच चर्चेत आहे.