संजय राऊतांनी आग लावण्याचे धंदे बंद करावेत; नारायण राणेंचा राऊतांवर प्रहार
‘गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नेता आज भाजपत नाही, ते असते तर युती तुटलीच नसती’ असं विधान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी केलं. राऊतांनी केलेल्या या विधानाला केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी राणे यांनी पेपरफुटी प्रकरणावर भाष्य करत अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. डिपॉझिट फर्स्ट […]
ADVERTISEMENT

‘गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नेता आज भाजपत नाही, ते असते तर युती तुटलीच नसती’ असं विधान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी केलं. राऊतांनी केलेल्या या विधानाला केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी राणे यांनी पेपरफुटी प्रकरणावर भाष्य करत अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
डिपॉझिट फर्स्ट या कार्यक्रमातंर्गत बुडीत बँकांच्या ठेवीदारांना धनादेशाचे वाटप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात करण्यात आले. या कार्यक्रमानंतर राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना काही मुद्द्यांबद्दल भूमिका विचारण्यात आली.
‘हे सरकार अस्तित्वात आहे का इथून सुरूवात आहे. सरकार अस्तित्वात नाही. सरकार चालतंय हे कुठेही दिसत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, मंजुरांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, विकासात्मक प्रश्न, कुठेही चालू नाहीयेत. याला एवढे पैसे दिले, हे फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात विकास ठप्प झाला आहे. सरकारचा प्रमुख व्यक्ती कार्यरत नसेल, तर यंत्रणेवर कुणाचा अंकुश असणार? सध्याची राज्याची परिस्थिती कठीण आहे. हे राज्य मागच्या दोन वर्षात किमान दहा वर्षे मागे गेलं आहे”, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.
पेपरफुटीसंदर्भातील घटनांवर नारायण राणे म्हणाले, “आता अंकुश नाही, तर हेच होणार ना… भ्रष्टाचार किती वाढलाय? पैसे देऊनच पेपर फुटतात ना… हा मोठा भ्रष्टाचार आहे,” असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.