राणेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं ! संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपीलाच जिल्हा बँकेचं अध्यक्षपद
महाविकास आघाडी विरुद्ध नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निमीत्ताने रंगलेल्या या सामन्याची अखेरीस काल सांगता झाली आहे. महिनाभर या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल करत महाविकास आघाडीने राणेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला खरा, परंतू राणेंनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावत १९ पैकी ११ जागा […]
ADVERTISEMENT

महाविकास आघाडी विरुद्ध नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निमीत्ताने रंगलेल्या या सामन्याची अखेरीस काल सांगता झाली आहे. महिनाभर या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल करत महाविकास आघाडीने राणेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला खरा, परंतू राणेंनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावत १९ पैकी ११ जागा जिंकत जिल्हा बँक आपल्याकडेच राखली आहे.
या विजयानंतर नारायण राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्याचं बोललं जातंय. संतोष परब हल्ला प्रकरणात आरोपी असलेल्या भाजपच्या मनिष दळवींना राणेंनी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. मनिष दळवी यांच्यावर हल्ल्यातील कटात सहभागी झाल्याचा आरोप आहे.
गिरे तो भी टांग उपर…सामना अग्रलेखातून शिवसेनेच्या भाजपला कानपिचक्या
नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाच या हल्ल्यातील आरोपीला अध्यक्षपद देत राणेंनी सेनेला आव्हान दिल्याची चर्चा सध्या सिंधुदुर्गात आहे.