नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण : गोळ्या झाडणाऱ्या दोन्ही आरोपींना साक्षीदारांनं ओळखलं

मुंबई तक

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींची ओळख पटली आहे. न्यायालयात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांने फोटोवरून दोन्ही आरोपींना ओळखलं. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता निर्णायक वळण मिळालं आहे. पुणे महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या किरण केशव कांबळे यांनी दोन्ही आरोपींना ओळखले आहे. किरण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींची ओळख पटली आहे. न्यायालयात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांने फोटोवरून दोन्ही आरोपींना ओळखलं. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता निर्णायक वळण मिळालं आहे.

पुणे महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या किरण केशव कांबळे यांनी दोन्ही आरोपींना ओळखले आहे. किरण कांबळे २०१३ मध्ये घडलेल्या या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन्ही नेमबाज आरोपींना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखलं आहे. सचिन अंदूरे आणि शरद कळसकर अशी साक्षीदाराने ओळखलेल्या आरोपींची नावे आहे.

पुणे विशेष न्यायालयासमोर दोन्ही आरोपींची ओळख पटवण्यात आली. यावेळी सीबीआयचे अधिकारीही हजर होते. किरण कांबळे यांनी फोटोवरून दोन्ही आरोपींना ओळखले आहे. या हत्येप्रकरणात सीबीआयनं सचिन अंदुरे याला औरंगाबादमधून अटक केलेली.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी हत्या करण्यात आली होती. ६७ वर्षीय डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी स्वतःला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला वाहून घेतलेलं होतं. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीही स्थापन केली होती.