नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली, जयंत नाईकनवरे नवे आयुक्त
राज्य सरकारने आज गृह विभागातील पोलीस अधिकाऱ्यांनी बदली केली आहे. ज्यात नाशिकच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली असून जयंत नाईकनवरे यांच्याकडे शहराचा पदभार सोपवण्यात आला आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे गेल्या काही दिवसांपासून विविध निर्णयांमुळे चांगलेच चर्चेत आले होते. हेल्मेट सक्ती, भोंग्यांवर मनाई आदेश, महसूल खात्यातील लेटर बॉम्ब, बॅनर परवानगी बंधनकारक, मिरवणूक परवानगी आवश्यक […]
ADVERTISEMENT
राज्य सरकारने आज गृह विभागातील पोलीस अधिकाऱ्यांनी बदली केली आहे. ज्यात नाशिकच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली असून जयंत नाईकनवरे यांच्याकडे शहराचा पदभार सोपवण्यात आला आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे गेल्या काही दिवसांपासून विविध निर्णयांमुळे चांगलेच चर्चेत आले होते.
ADVERTISEMENT
हेल्मेट सक्ती, भोंग्यांवर मनाई आदेश, महसूल खात्यातील लेटर बॉम्ब, बॅनर परवानगी बंधनकारक, मिरवणूक परवानगी आवश्यक असे विविध आदेश दीपक पांडे यांनी आपल्या कारकिर्दीत काढले होते. याचसोबत भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर केलेल्या कारवाईमुळेही दीपक पांडे चर्चेत राहिले.
रात्री 10 ते सकाळी 6 शहरात भोंग्यांना बंदी ! मुंबई पोलिसांचा महत्वाचा निर्णय
हे वाचलं का?
मध्यंतरी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसदर्भात दीपक पांडे यांनी लिहीलेलं पत्र चांगलंच चर्चेत होतं. महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार म्हणजे आरडीएक्स आणि डिटोनेटर सारखे असल्याचं पांडे यांनी म्हटलं होतं. यातून एक जिवंत बाँब तयार तो भूमाफीयांच्या मर्जीप्रमाणे वागतो.
१५ दिवसांत ७०० चिथावणीखोर पोस्ट सोशल मीडियावरून ‘डिलिट’; यशस्वी यादवांची धक्कादायक माहिती
ADVERTISEMENT
हे भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचा छळ करून वित्तीय आणि जिवितास धोका निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केला होता. तसेच महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घ्यावेत, अशी मागणी दीपक पांडे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली होती. दीपक पांडे यांच्या पत्राचे पडसाद मंत्रीमंडळ बैठकीतही पडले होते, ज्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT