Pune Nashik Highway Accident : रस्ता ओलांडतानाच काळाची झडप, 5 महिला ठार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nashik Pune Highway Accident News : पुणे-नाशिक महामार्गावर सोमवारी रात्री भयंकर अपघात घडला. पुण्यातील खेड तालुक्यातील महिलांना एका भरधाव कारने उडवले. यात पाच महिलांचा मृत्यू झाला असून, 12 जखमी झाल्या आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील खरापुडी फाटा येथे ही दुर्घटना घडली. अपघातानंतर कारचालक दुभाजक तोडून फरार झाला. जखमी महिलांवर सध्या उपचार सुरू आहेत. (Nashik-Pune highway accident : Five women died and 12 injured after car hit)

ADVERTISEMENT

पुणे-नाशिक महामार्गावर खरापुडी फाटा येथे 17 महिला रस्ता ओलांडत होत्या. याच वेळी एका भरधाव कारने त्यांना जोराची धडक दिली. या तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 महिलांचा उपचारादरम्यान.

पुणे शहरातील 17 महिला खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी जात होत्या. रात्री या महिला कामासाठी निघाल्या होत्या. खरापुडी फाटा येथे रात्री 11 वाजता महिला पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या लेन ओलांडून जात होत्या.

हे वाचलं का?

भाईंदरच्या खाडीत श्रद्धाचा मोबाईल-क्रेडीट कार्ड, आफताबने सांगितली 4 महिन्यांची सगळी कहाणी

पुणे-नाशिक : रस्ता ओलांडताना महिलांना कारने उडवले

महिला रस्ता ओलांडत असतानाच महिंद्रा कंपनीच्या एका भरधाव कारने जोरात धडक दिली. महिलांना धडक दिल्यानंतर कार थांबली नाही. दुभाजक तोडून कारचालक फरार झाला. अपघातात 7 महिलांचा मृत्यू झाला असून, 12 महिला जखमी झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

Crime : पुतण्याचे काकीशी अनैतिक संबंध अन् हत्या, ‘असा’ झाला भांडाफोड!

ADVERTISEMENT

12 जखमी महिलांवर उपचार सुरू

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. काही जखमी महिलांवर खासगी तर काही जणींवर चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खेड पोलीस तपास करत आहेत. पोलिसांकडून सध्या फरार कारचालकाचा शोध घेतला जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT