नाशिक विधान परिषद: सर्वात मोठी बातमी, सत्यजीत तांबेंनी भरला अपक्ष फॉर्म
नाशिक: नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीतील सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. कारण अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आता हा उमेदवारी अर्ज सत्यजीत तांबेंनी काँग्रेसच्या AB फॉर्मवर भरला की नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे या संपूर्ण निवडणुकी बाबत बराच सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडीत नाशिक […]
ADVERTISEMENT

नाशिक: नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीतील सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. कारण अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आता हा उमेदवारी अर्ज सत्यजीत तांबेंनी काँग्रेसच्या AB फॉर्मवर भरला की नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे या संपूर्ण निवडणुकी बाबत बराच सस्पेन्स कायम आहे.
महाविकास आघाडीत नाशिक पदवीधर मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाटणीला आला होता. पण या मतदारसंघाबाबत काँग्रेसने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारच जाहीर केला नव्हता. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या तासाभरात काँग्रेसने अचानक डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी जाहीर केली.
खरं तर या जागेवरुन निवडणूक लढविण्यासाठी सत्यजीत तांबे हे इच्छुक होते. पण काँग्रेसने सुधीर तांबेंना निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. पण या सगळ्या गोष्टींची आधीच जाणीव असल्याने सत्यजीत तांबे यांनी दोन फॉर्म तयार ठेवले होते. एक फॉर्म हा काँग्रेस पक्षाच्या वतीने भरलेला तर दुसरा फॉर्म हा अपक्ष म्हणून भरण्यात आला होता. पण काँग्रेसचा AB फॉर्म न मिळाल्याने आता सत्यजीत तांबे हे नाशिक पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून दिसणार आहेत.
दुसरीकडे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी आपल्या मुलासाठी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली उमेदवारी देखील नाकारली आहे. त्यांनी आपली सगळी ताकद मुलाच्या पाठिशी उभी केली आहे.