National Cooperative Conference: महाराष्ट्रातील ‘या’ 5 लोकांना अमित शाहांनी केलं नमन!
नवी दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah)यांनी आज (25 सप्टेंबर) पहिल्यांदाच देशातील पहिल्यावहिल्या सहकार संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. (Cooperative conference)नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये (Indira Gandhi Indoor Stadium) हे संमेलन आयोजित करण्यात आलं होत. याच संमेलनात अमित शाह यांनी महाराष्ट्रातील 5 सहकार महर्षींचा आवर्जून उल्लेख केला. या संमेलनासाठी विविध राज्यातील सहकार क्षेत्राशी संबंधित […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah)यांनी आज (25 सप्टेंबर) पहिल्यांदाच देशातील पहिल्यावहिल्या सहकार संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. (Cooperative conference)नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये (Indira Gandhi Indoor Stadium) हे संमेलन आयोजित करण्यात आलं होत. याच संमेलनात अमित शाह यांनी महाराष्ट्रातील 5 सहकार महर्षींचा आवर्जून उल्लेख केला.
या संमेलनासाठी विविध राज्यातील सहकार क्षेत्राशी संबंधित अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते. यावेळी देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांनी केलेल्या भाषणात महाराष्ट्रातील पाच नेत्यांचा आवर्जून उल्लेख केला ज्यांनी सहकार क्षेत्रासाठी मोलाचं योगदान दिलं.
यावेळी अमित शाह यांनी सहकार क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ, लक्ष्मणराव इनामदार, विठ्ठलराव विखे-पाटील यांच्यासह सहकार क्षेत्रासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या माधवराव गोडबोले यांचा उल्लेख करत त्यांना अभिवादनही केलं.
अमूल आणि लिज्जत पापड कंपन्यांचंही केलं कौतुक










