राणा दाम्पत्याने प्रवासादरम्यान रेल्वेच थांबवली, कारण होते…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धनंजय साबळे

ADVERTISEMENT

अमरावती: हनुमान चालीसा पठण प्रकरणी 15 जून रोजी न्यायालयापुढे हजर राहण्यासाठी काल अमरावती-मुंबई-अमरावती या रेल्वेने प्रवास करत असताना या गाडीतील प्रवाशांनी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना बघताच त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार केली. अमरावती-मुंबई- अमरावती गाडीतील एसी बंद असल्याकारणाने या एसी कंपार्टमेंट मधील वृद्ध आहे आणि उपचार घेण्याकरिता मुंबईला जाणारे रुग्णांना या बंद एसीचा प्रचंड प्रमाणात त्रास होत असल्याचे आढळून आले.

त्याच क्षणी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी रेल्वे स्थानकावरच रेल्वे थांबवली. गाडीला प्लॅटफॉर्मवरती 15 ते 20 मिनिटे थांबवूनच तात्काळ एसी सुरू करून प्रवाशांना सुविधा देण्याचे आदेश दिले. या सर्व प्रकारामुळे रेल्वे प्रशासन खडबडून झाले. खासदार नवनीत राणा यांनी येथील रेल्वे प्रशासनाची आणि स्थानकावर असलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली.

हे वाचलं का?

हनुमान चालीसा प्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा मुंबई सत्र न्यायालयात आज हजेरी लावणार आहेत. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मागितलेला जामीन रद्द करण्याबाबत त्यांना आपले म्हणणे मांडायचे आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा वाचणार अशी घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यांनतर शिवसैनिक रात्रभर मातोश्री बाहेर पहारा देत होते. शिवसैनिक आणि राणा दाम्पत्य यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT