नवनीत आणि रवी राणा गुपचूप मुंबईत दाखल, शिवसैनिकांकडून झाडाझडती सुरू
नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनाही मुंबईत जाऊ देणार नाही. अमरावती स्टेशनवर येऊन दाखवा असा इशारा शिवसैनिकांनी दिला होता. मात्र गनिमी कावा करत नवनीत राणा आणि रवी राणा विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत ते गुपचूप आले आहेत. ते दोघेही कुठे उतरलेत ते समजू शकलेलं नाही. पण शिवसैनिकांनी मुंबईत ठिकठिकाणी झाडाझडती सुरू केली आहे. […]
ADVERTISEMENT

नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनाही मुंबईत जाऊ देणार नाही. अमरावती स्टेशनवर येऊन दाखवा असा इशारा शिवसैनिकांनी दिला होता. मात्र गनिमी कावा करत नवनीत राणा आणि रवी राणा विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत ते गुपचूप आले आहेत. ते दोघेही कुठे उतरलेत ते समजू शकलेलं नाही. पण शिवसैनिकांनी मुंबईत ठिकठिकाणी झाडाझडती सुरू केली आहे.
हनुमान चालिसावरून नवनीत राणा – रवी राणा ठाम, दादा भुसे म्हणतात…
मातोश्रीसमोर हनुमाना चालीसा पठण करणार असल्याचं आव्हान नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनीही दिलं आहे. त्यासाठीच ते दोघं मुंबईत दाखल झाले आहेत. अशात शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले आहेत.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दोघांनाही रोखण्यासाठी आज संध्याकाळपासूनच बडनेरा स्टेशनच्या बाहेर जमणार होते. तसंच सोशल मीडियाद्वारे रेल्वे स्थानकावर उपस्थित राहण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं.