राज्यात ड्रग्जचा खेळ देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरून; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे यांना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने क्लीन चीट दिल्यावरूनही मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले. पत्रकार परिषेदत बोलताना मलिक म्हणाले,’देशातील मागासवर्गातील लोकांना न्याय देणं ज्यांचं काम आहे. ते स्वतः दाऊद वानखेडे यांच्यासोबत पत्रकार […]
ADVERTISEMENT

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे यांना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने क्लीन चीट दिल्यावरूनही मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले.
पत्रकार परिषेदत बोलताना मलिक म्हणाले,’देशातील मागासवर्गातील लोकांना न्याय देणं ज्यांचं काम आहे. ते स्वतः दाऊद वानखेडे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतात. ज्यांनी फसवणूक करून जात प्रमाणपत्र मिळवलं, त्यांचं समर्थन करत आहेत, हे दुर्दैव आहे’, अशी टीका मलिक यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यावर केली.
नवाब मलिक यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप, म्हणाले…
‘अरुण हरदल हे भाजपचे नेते असतील, पण त्यांना हे समजून घ्यावं लागेल की, मागासवर्ग आयोगाची जबाबदारी, उत्तरदायित्व काय आहे? त्याची कार्यपद्धती समजून घ्यावी लागेल. त्यांचं आचरण कसं असावं. सर्व मर्यादांचा ते भंग करीत आहे, असं आम्हाला वाटतं. खोटं जात प्रमाणपत्र असल्याचा पडताळणी करण्याचा अधिकार मागासवर्ग आयोगाला नाही. देशात के. रामस्वामी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते, तेव्हा त्यांनी आदेश दिला होता की देशात प्रत्येक जिल्ह्यात पडताळणी करण्यासाठी समित्या नेमण्यात यावी’, असं सांगत मलिकांनी हरदल यांच्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त केली.