नवाब मलिकांनी स्वीकारलं फडणवीसांचं आव्हान, प्रत्युत्तर देत म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई ड्रग्ज प्रकरणात आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी काही थांबताना दिसत नाहीयेत. आर्यन खान जामिनावर सुटून घरी गेला. मात्र आरोपांच्या फैरी काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. आज नवाब मलिक यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी लवंगी फटाका फोडला मी मात्र दिवाळीनंतल बॉम्ब फोडणार आहे असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या या इशाऱ्याला नवाब मलिक यांनी तीन शब्दात उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचं हे आव्हान स्वीकारलं असून ‘है तय्यार हम’ असं तीन शब्दांमध्ये ट्विट करत चॅलेंज स्वीकारल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतर काय राजकीय फटाके फुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मलिकांनी अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

हे वाचलं का?

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

‘मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबध अंडरवर्ल्डशी आहेत. अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्ज संदर्भातही बोलू नये. अंडरवर्ल्ड संदर्भातील पुरावे आपल्यासमोरही मांडेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पाठवणार आहे. दिवाळी संपण्याची वाट पाहा. त्यांनी सुरुवात केली आहे, मी शेवट करेन. दिवाळीच्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार’ असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिला होता.

ADVERTISEMENT

Drugs Case : नीरज गुंडेंचे उद्धव ठाकरेंशीही चांगले संबंध?; नवाब मलिक म्हणाले…

ADVERTISEMENT

नवाब मलिक यांनी काय केला होता आरोप?

देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरुन राज्यात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना अमृता फडणवीसांनी नदी संवर्धनासाठी गाणं गायलं होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनय केला होता. डायरेक्टर सचिन गुप्ता होते. ते गाणं अभिजीत जोशी यांनी लिहिलेले होते. त्याचे फायनान्स हेड ड्रग्स पेडलर जयदीप राणा होता. जयदीप राणा यांच्यासोबत फडणवीसांचा काय संबंध आहे? याची चौकशी व्हायला पाहिजे, असं मलिक म्हणाले होते. देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात ड्रग्सचे धंदे चालतात. जयदीप राणा हे फडणवीसांच्या घरच्या कार्यक्रमात उपस्थित राहतात. ड्रग्स रॅकेटला फडणवीस संरक्षण देतात, असा गंभीर आरोप मलिक यांनी यावेळी केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT