हे षडयंत्र… योगी आदित्यनाथांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मुंबई तक

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र असून, समीर वानखेडेंच्या माध्यमातून हे केलं जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरलाही उत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मलिक म्हणाले, ‘मी आधीच सांगितलं होत की […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र असून, समीर वानखेडेंच्या माध्यमातून हे केलं जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरलाही उत्तर दिलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मलिक म्हणाले, ‘मी आधीच सांगितलं होत की हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र वानखेडेंच्या माध्यमातून होत आहे. हे प्रकरण रिया चक्रवर्तीपासून सुरू झालं. या प्रकरणात चित्रपटसृष्टीतील लोकांना एकापाठोपाठ एक बोलावण्यात आलं. एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे. त्यात एकालाही अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरूच आहे. जर एखाद्या घडनेत गडबड झालेली असेल तर अटक झाली पाहिजे. त्याच प्रकरणातून वसुलीचा धंदा सुरू आहे’, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

वानखेडे कुटुंबाविरोधात नवाब मलिक यांचं घाणेरडं राजकारण, किरीट सोमय्यांचा आरोप

‘भाजपकडून हा कट केला जात आहे. महाराष्ट्रातील सरकार, महाराष्ट्रातील लोक आणि मुंबईतील बॉलिवूडला बदनाम करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. योगी महाराज नोएडात फिल्मसिटी बनवू इच्छितात. ताज हॉटेलमध्ये येऊन ते लोकांना भेटले. भाजपचे जे समर्थक आहेत, ते त्यांना भेटले होते. बॉलिवूडला बदनाम केल्यानं बॉलिवूड मुंबईतून बाहेर जाईल, असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहिती नाही की, बॉलिवूड बनवायला दादासाहेब फाळके, व्ही. शांतारामपासून ते अनेक मराठी कलाकारांनी काम केलं. त्यांनी ओळख मिळवून दिली. बॉम्बे नाव असल्यानं त्याचं नाव बॉलिवूड असं करण्यात आलं. बॉलिवूड देशाची संस्कृती जगभरात घेऊन जातं. योगींना यूपीवूड तयार होईल असं वाटतं असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे’, असं मलिक म्हणाले.

हे वाचलं का?