Nagpur : आर्यन खानला अटक करणारे NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे RSS स्मृती मंदिरात
Ex. NCB officer Sameer Wankhede : नागपूर : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वानखेडे यांनी आज पत्नी क्रांती रेडकर समवेत नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रेशिमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीवर जाऊन फुलं वाहिली. तसंच यावेळी त्यांनी […]
ADVERTISEMENT
Ex. NCB officer Sameer Wankhede :
ADVERTISEMENT
नागपूर : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वानखेडे यांनी आज पत्नी क्रांती रेडकर समवेत नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रेशिमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीवर जाऊन फुलं वाहिली. तसंच यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. (Ex. NCB officer Sameer Wankhede visit RSS Smriti Mandir in Nagpur)
आता समीर वानखेडे यांच्या अशा अचानक भेटीने चर्चांना उधाण आलं आहे. तासभर चाललेल्या या बैठकीनंतर विविध अंदाज बांधले जात आहेत. या भेटीमागे समीर वानखेडे यांचा काही राजकीय हेतू आहे का? असाही सवाल विचारला जात आहे.
हे वाचलं का?
ठाकरे-दरेकरांमध्ये विधानसभेबाहेर सहानुभूतीची युती! नेमकं काय घडलं?
दरम्यान, या भेटीची ठोस माहिती समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्या बैठकीला राजकीय कारण असून या भेटीत त्यांनी आपली राजकीय इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती आहे. राजकारणी म्हणून देशाच्या विकासात योगदान देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
लोकसभेची निवडणूक लढविणार?
समीर वानखेडे लवकरच देशातील सर्वात मोठा पक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार असून 2024 ची लोकसभेची सार्वत्रिक निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. यासाठी वाशिम मतदारसंघाचीही चर्चा आहे. समीर वानखेडेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या भेटीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. तसंच भाजपमधील प्रवेशावरही किंवा पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याबाबत त्यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.
ADVERTISEMENT
नवी मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ‘त्या’ हत्येचं गूढ उकललं; वादाचं मूळ गुजरातमध्ये!
एनसीबीचे अधिकारी म्हणून समीर वानखेडेंनी महाराष्ट्रात मोठी ओळख मिळवली होती. तसंच एनसीबीच्या माध्यमातून त्यांनी ड्रग्ज तस्कर आणि बॉलीवूड इंडस्ट्रीला हादरवून सोडलं होतं. ते एनसीबीच्या विभागीय संचालकपदी असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे ते खूप प्रसिद्ध झाले होते. पण त्यानंतर त्यांनी ही खोटी कारवाई केली असल्याचा आरोप झाला होता. त्यातून त्यांच्या नावाबद्दल मोठा वाद झाला होता. त्यानंतर त्यांची चेन्नईला बदली करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT