जावयाच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते Eknath Khadse यांना ED चं समन्स
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ED ने म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाने समन्स बजावला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांना गुरूवारी सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितलं आहे. यापूर्वीही एकनाथ खडसे यांची ईडीने धक्का दिला. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरींना अटक केली. पुण्यातील भोसरी या ठिकाणी जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी […]
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ED ने म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाने समन्स बजावला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांना गुरूवारी सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितलं आहे. यापूर्वीही एकनाथ खडसे यांची ईडीने धक्का दिला. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरींना अटक केली. पुण्यातील भोसरी या ठिकाणी जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू केली होती. त्यानंतर त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान यानंतर लगेचच एकनाथ खडसे यांना समन्स बजावण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे भोसरी येथील जमीन खरेदीचा घोटाळा?
सन 2016 मध्ये एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना त्यांच्यावर पुण्याजवळील भोसरी येथील भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक 52/2अ/2 मधील 3 एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केली होती. हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना अकानी नामक व्यक्तीकडून खरेदी केला होता. पुण्याच्या उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले होते. या भूखंडाचा सातबारा हा एमआयडीसीच्या नावावर होता. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
हे वाचलं का?
कोण आहेत गिरीश चौधरी?
गिरीश चौधरी हे एकनाथ खडसे यांची मुलगी शारदा खडसे-चौधरी यांचे पती आहेत. काही वर्षांपूर्वी ते परदेशात वास्तव्याला होते. अलीकडे ते भारतात राहत असल्याचे सांगितले जात आहे. खडसे यांनी 2016 मध्ये पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीतील सर्वे क्रमांक 52/2अ/2 मधील 3 एकरचा भूखंड पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप होता.
ADVERTISEMENT
एकनाथ खडसे यांनी काय म्हटलंय?
ADVERTISEMENT
एकनाथ खडसे यांच्या म्हणण्यानुसार, मूळ जमीन मालकाने संपादित जमिनीचा मोबदला आधी घेतला नसल्याने आणि भूसंपादन प्रक्रिया व्यपगत झाली असल्याने आजही तो जमीन मालक आहे. तसंच तो ती जमीन कुणालाही विकू शकतो, म्हणून आपणही त्याच्याकडून जमीन विकत घेऊ शकतो. त्यात काहीही बेकायदेशीर नाही. मात्र आता याच प्रकरणी गुरूवारी सकाळी 11 वाजता एकनाथ खडसेंना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT