राष्ट्रवादीतले नेते समोरासमोर! उमेश पाटलांनी राजन पाटलांविरुद्ध थोपडले दंड; म्हणाले, ‘…तर राजकारण सोडेन’
–विजयकुमार बाबर, सोलापूर सोलापूर जिल्ह्यातले दोन नेत्यांमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात सातत्यानं आरोप-प्रत्यारोप, आव्हान-प्रतिआव्हान दिलं जाताना बघायला मिळत आहे. राजन पाटील यांनी माझ्या कार्यकर्त्यासोबत निवडणूक लढवून जिंकून दाखवा, असं आव्हान दिलं होतं. त्यावर उमेश पाटलांनी प्रतिआव्हान दिलंय. ‘तुम्ही अनगर सोडा, मी […]
ADVERTISEMENT

–विजयकुमार बाबर, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातले दोन नेत्यांमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात सातत्यानं आरोप-प्रत्यारोप, आव्हान-प्रतिआव्हान दिलं जाताना बघायला मिळत आहे. राजन पाटील यांनी माझ्या कार्यकर्त्यासोबत निवडणूक लढवून जिंकून दाखवा, असं आव्हान दिलं होतं. त्यावर उमेश पाटलांनी प्रतिआव्हान दिलंय.
‘तुम्ही अनगर सोडा, मी नरखेड सोडतो. तालुक्यातून कुठूनही उभे राहा. तुमची दोन्ही पोरं सोडा, स्वतः राजन पाटलांनी निवडणुकीला उभं राहावं, यात जर मी पराभूत झालो तर तालुक्याचंच काय, जिल्ह्याचं राजकारण सोडेन. गोरगरीब कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक देऊन त्यांची घरं जाळण्याचा उद्योग बंद करा”, असं आव्हान उमेश पाटील यांनी राजन पाटलांना दिलंय.
मोहोळ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान राजन पाटील यांनी ‘माझ्या कार्यकर्त्यांसोबत तुम्ही निवडणूक लढवून आणि जिंकून दाखवा’, असं आव्हान उमेश पाटील यांना दिलं होतं. त्याला उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आव्हानं दिलं.