राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम अजितदादांनी केलं-अमोल कोल्हे
पुण्यात मेट्रोचं उद्घघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंचावर भाषण केलं. त्यावेळी त्यांनी 12 वर्षे पुण्याला मेट्रोसाठी वाट बघावी लागली असंही म्हटलं आहे. त्याचसोबत त्यांनी राज्यपालांचं नाव न घेता त्यांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच केली. अजित पवारांनी ज्या रोखठोकपणे मंचावर जे सांगितलं त्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोल […]
ADVERTISEMENT
पुण्यात मेट्रोचं उद्घघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंचावर भाषण केलं. त्यावेळी त्यांनी 12 वर्षे पुण्याला मेट्रोसाठी वाट बघावी लागली असंही म्हटलं आहे. त्याचसोबत त्यांनी राज्यपालांचं नाव न घेता त्यांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच केली. अजित पवारांनी ज्या रोखठोकपणे मंचावर जे सांगितलं त्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी कौतुक केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत अमोल कोल्हे?
“रोखठोक अजितदादांकडून झणझणीत अंजन! महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम आज अजितदादांनी केले. हे गरजेचे होते आणि ते फक्त अजितदादाच करू शकतात.”
हे वाचलं का?
रोखठोक अजितदादांकडून झणझणीत अंजन!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम आज अजितदादांनी केले. हे गरजेचे होते व ते फक्त @AjitPawarSpeaks दादाच करू शकतात! pic.twitter.com/ombOkcGRZi
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 6, 2022
काय म्हणाले अजित पवार?
अलिकडे अनेक गोष्टी घडत आहेत. सन्मानीय व्यक्तींकडून अनेक अनावश्यक वक्तव्यं केली जात आहेत. अशी वक्तव्यं महाराष्ट्राला मान्य होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. राजमाता जिजाऊ यांच्याकडूनच त्यांनी यासंबंधीचे धडे घेतले होते.
ADVERTISEMENT
बऱ्याच गोष्टी घडत आहेत.मला पंतप्रधान यांना काही गोष्टी लक्षात आणून देयचे आहेत अलीकडे काळात महत्वाच्या पदावर बसलेल्या सन्माननिय व्यक्तीकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत.ही वक्तव्यं महाराष्ट्राला आणि कुठल्याही व्यक्तीला पटणारी नाही.मान्य देखील नाही
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांनी संकल्पनेतील रयतेचं राज्य आणि स्वराज्य स्थापन केले तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सत्यशोधक विचारांचा प्रचार केला. या महामानवाच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. मनात कुणाच्याही विरोधात आकस न ठेवता विकास कामात राजकारण न करता हा वारसा या महामानवाचा विचार आपल्याला पुढे न्यायचं आहे ही मी नम्रतापूर्वक सांगतो. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार त्यांच्या भाषणात पुढे म्हणाले की, पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थाने दाद दिली पाहिजे. पुणे मेट्रो सुरु करण्यासाठी जवळपास 12 वर्षे लागली. नितीन गडकरींनी वेळोवेळी कठोर भूमिका घेतली आणि त्यामुळे कुठेतरी मेट्रोला सुरुवात झाली. एक गोष्ट मान्य करावी लागेल की, पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना मेट्रो आणि अन्य विकासकामावेळी खूप त्रास सहन करावा लागला. अजूनही काही काळ हा त्रास सहन करावा लागणार आहे. ही विकासकामं अजून काही वर्षे सुरु राहणार असल्याचं अजित पवार हे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT