सुप्रिया सुळेंनी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची थेट अमित शाहांकडे केली तक्रार
महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या राड्याने झाली. विधानभवनात राज्याच्या जनतेसाठी कायदे केले जातात आणि विधेयकं मांडून निर्णय घेतले जातात. त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले आमदार भिडल्याचं पाहण्यास मिळालं. यासंदर्भातली तक्रार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. Maharashtra Assembly: ‘आम्हीच धक्काबुक्की केली’; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांमध्ये […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या राड्याने झाली. विधानभवनात राज्याच्या जनतेसाठी कायदे केले जातात आणि विधेयकं मांडून निर्णय घेतले जातात. त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले आमदार भिडल्याचं पाहण्यास मिळालं. यासंदर्भातली तक्रार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली.
Maharashtra Assembly: ‘आम्हीच धक्काबुक्की केली’; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांमध्ये राडा का झाला?
विधानभवनाच्या पायऱ्यांवर नेमकं काय घडलं?
विधानभवनाच्या पायऱ्यावर शिवसेनेच्या आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून शिंदे गटाविरुद्ध घोषणाबाजी होताना दिसतेय. आज शिंदे गटातील आमदारांनी बॅनर घेऊन पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरू केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्या शाब्दिक खटका उडाला. झटापट सुरू असतानाच धक्काबुक्की करायची नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले. त्यानंतर रोहित पवार, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, अजित पवार यांनी मध्यस्थी केली.
शिंदे गटाचा थेट उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिंदे गटाने थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला. ‘कोविडच्या भीतीने राजा बसला घरी, हवालदिल जनता फिरली दारोदारी. युवराजांच्या चेल्यांनी लुटली तिजोरी, भ्रष्टाचाराचे खोके पोहोचले यांच्या घरोघरी. पक्ष टिकवण्यासाठी लढणारे गद्दार, पक्ष संपवणारे यांच्यासाठी मोठे खुद्दार. खुर्चीसाठी केले हिंदुत्व हद्दपार, खुर्चीवर बसल्यावर शिवसैनिक केले वेशीपार, खुर्ची गेल्यावर आता फिरतात दारोदार”, असे बॅनर शिंदे गटातील आमदारांनी झळकावले.