विराट कोहलीने शतकी खेळी करत रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडला, पण टीम इंडिया झाली पराभूत
Virat Kohli Breaks Ricky Ponting's Record : एकीकडे टीम इंडियावर दबाव वाढत असताना विराट कोहलीने भारताचा डाव सावरला आणि शेवटपर्यंत विजयाची आशा जिवंत ठेवली. मात्र, या सामन्यात विराटने शतकी खेळी करुनही भारताला केवळ 296 धावा करता आल्या अन् टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागलाय. पण या शतकी खेळीसह विराटने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फलंदाज रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विराट कोहलीने शतकी खेळी करत रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडला
पण टीम इंडिया झाली पराभूत
Virat Kohli Breaks Ricky Ponting's Record : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचं वर्चस्व सिद्ध केलंय. विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात शतकी खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 337 धावा केल्या आणि भारतासमोर 338 धावांचे आव्हान ठेवले. न्यूझीलंडच्या या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने अतिशय खराब सुरुवात केली. मात्र एकीकडे टीम इंडियावर दबाव वाढत असताना विराट कोहलीने भारताचा डाव सावरला आणि शेवटपर्यंत विजयाची आशा जिवंत ठेवली. मात्र, या सामन्यात विराटने शतकी खेळी करुनही भारताला केवळ 296 धावा करता आल्या अन् टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागलाय. पण या शतकी खेळीसह विराटने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फलंदाज रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडलाय.
विराटने रिकी पॉन्टिंगचा कोणता विक्रम मोडला?
विराट कोहलीने आपल्या या डावात केवळ धावाच काढल्या नाहीत, तर नवख्या फलंदाजांना सोबत घेऊन डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याची फलंदाजी पाहताना चाहत्यांना पुन्हा एकदा ‘क्लासिक कोहली’ची झलक पाहायला मिळाली. ड्राइव्ह, कट आणि पुल शॉट्ससह त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. अखेरीस कोहलीने आपले 54 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले आणि पुन्हा एकदा इतिहास रचला. या शतकासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराट कोहलीने एकूण 12,662 धावा पूर्ण केल्या. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पॉन्टिंग यांचा 12,655 धावांचा विक्रम मागे टाकला. त्यामुळे कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. हा विक्रम त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे आणि दीर्घकाळ टिकून राहिलेल्या फिटनेसचे उत्तम उदाहरण मानला जात आहे.
वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वांत जास्त धावा करणारे फलंदाज
विराट कोहली- 12,676 रन (244 डाव)
रिकी पॉन्टिंग- 12, 662 रन (330 डाव)










