उद्या मुंबईचा महापौर ठरणार? शिंदे गट आणि भाजपची ताज लँड्समध्ये महत्त्वाची बैठक, 'या' नेत्यांमध्ये होणार चर्चा

मुंबई तक

BMC Mayor : संख्याबळाचा विचार करता महापौर महायुतीचाच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक होणार असल्याची बातमी समोर आली आहे. 

ADVERTISEMENT

BMC Mayor
BMC Mayor
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्या मुंबईचा महापौर ठरणार?

point

शिंदे गट आणि भाजपची ताज लँड्समध्ये महत्त्वाची बैठक

BMC Mayor : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महापौर शिवसेनेचा व्हावा अशी मागणी शिंदे गटातर्फे केली जात आहे; तर देवाच्या मनात असेल तर ठाकरे गटाचा महापौर होईल असं विधान शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र संख्याबळाचा विचार करता महापौर महायुतीचाच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक होणार असल्याची बातमी समोर आली आहे. 

हे ही वाचा : 'जोवर मनसे आहे तोवर बिहार भवन होऊ देणार नाही', राज ठाकरेंचा 'शिलेदार' कडाडला

बैठकीला कोण असणार उपस्थित?

मुंबई महापालिका निवडणुकीत महायतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांची उद्या मंगळवारी सत्ता स्थापनेसाठी महत्वाची बैठक मुंबईत वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेल मध्ये होणार आहे. शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.

'शिवसेनेचा महापौर व्हावा'

महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. मुंबईचा महापौर शिंदे यांच्या शिवसेनेचाच व्हावा अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी असल्याच्या चर्चा वृत्तमाध्यमातून प्रसारीत होताना दिसत आहेत. अशा गंभीर स्थितीत त्यांचे काही नगरसेवक हे हॉटेलवर, तर काही नगरसेवक हे नॉटरिचेबल आहेत. 2026 हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा व्हावा अशी मागणी शिंदे गटातर्फे केली जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp