Supriya Sule: ‘पंतप्रधान मोदींनी आमचं मन दुखावलं’, पाहा सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या
पालघर: ‘पंतप्रधान हे कोणत्याही एका राज्याचे नसून देशाचे पंतप्रधान असतात. पण पंतप्रधान मोदी हे नेहमीच महाराष्ट्र राज्याच्या विरोधात बोलतात. हे दुर्दैवी आहे.’ असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. सुप्रिया सुळे आज (28 एप्रिल) पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. ‘कालच्या बैठकीत पंतप्रधान […]
ADVERTISEMENT

पालघर: ‘पंतप्रधान हे कोणत्याही एका राज्याचे नसून देशाचे पंतप्रधान असतात. पण पंतप्रधान मोदी हे नेहमीच महाराष्ट्र राज्याच्या विरोधात बोलतात. हे दुर्दैवी आहे.’ असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
सुप्रिया सुळे आज (28 एप्रिल) पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.
‘कालच्या बैठकीत पंतप्रधान मोदी कोरोनाबाबत काहीतरी ठोस बोलतील असं वाटत होतं. मात्र तसं न करता त्यांनी सर्व गोष्टी राज्यांवर ढकलून दिल्या. त्यातच पुन्हा एकदा महाराष्ट्र विरोधात बोलून त्यांनी आमचं मन दुखावलं.’ असं म्हणत सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत अचानक पेट्रोलच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसंच महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अद्यापही पेट्रोलवरील VAT कमी केलेला नाही असं म्हणत त्यांनी राज्यांना VAT कमी करण्याचे आवाहन देखील केले होते.