आंब्याच्या झाडावर दगड मारले जातात, बाभळीच्या नाही; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये जी सभा घेतली ती अजूनही चर्चेत आहे. या सभेत त्यांनी शरद पवारांना पुन्हा एकदा टार्गेट केलं. शरद पवार हे जाती-पातीचं राजकारण करतात असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. तसंच राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयता वाढली या आरोपाचाही पुनरूच्चार राज ठाकरेंनी केला आहे. त्या आरोपांना आता खासदार सुप्रिया […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये जी सभा घेतली ती अजूनही चर्चेत आहे. या सभेत त्यांनी शरद पवारांना पुन्हा एकदा टार्गेट केलं. शरद पवार हे जाती-पातीचं राजकारण करतात असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. तसंच राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयता वाढली या आरोपाचाही पुनरूच्चार राज ठाकरेंनी केला आहे. त्या आरोपांना आता खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.
Supriya Sule: ‘पंतप्रधान मोदींनी आमचं मन दुखावलं’, पाहा सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीच्या झाडाला कुणी दगड मारतं का? असा टोला राज ठाकरेंना सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. एवढंच नाही तर मी यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात तयार झाले आहे. त्यांच्या संस्कारांमध्ये कधीही अल्टिमेटम हा शब्द नव्हता. त्यामुळे मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही. यशवंतराव चव्हाणांच्या वागण्यात नम्रता होती. त्यामुळे माझा या शब्दाचा अभ्यास नाही असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.