राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटलांना कोरोनाची लागण
मुंबई: राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त नुकतंच हाती आली आहे. जयंत पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती दिली आहे. जयंत पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरीही त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली आहे. सध्या जयंत पाटील हे […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त नुकतंच हाती आली आहे. जयंत पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
जयंत पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरीही त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली आहे. सध्या जयंत पाटील हे आपल्याच घरी विलगीकरणात असून डॉक्टरांच्या सल्लानुसार उपचार घेत आहेत. यावेळी त्यांनी असं आवाहन देखील केलं आहे की, ज्या-ज्या व्यक्ती हे त्यांच्या संपर्कात आले होते त्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 18, 2021
दरम्यान, जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा केला होता. अद्यापही त्यांची ही यात्रा पूर्ण झालेली नाही. मात्र, कोरोनाची लागण झाल्याने त्यांना आपली ही यात्रा आता काही काळापुरता तरी स्थगित करावी लागणार आहे.