आम्ही कुणी नाही, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरीच आमच्या संपर्कात-अब्दुल सत्तार

मुंबई तक

आम्ही कुणीही नाही तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरीच आमच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य अमोल मिटकरींनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याबाबत आता अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं आहे. अमोल मिटकरीच आमच्या संपर्कात आहेत ते कधी इकडे येत आहेत त्यांनी सांगावं असंही सत्तार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आम्ही कुणीही नाही तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरीच आमच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य अमोल मिटकरींनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याबाबत आता अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं आहे. अमोल मिटकरीच आमच्या संपर्कात आहेत ते कधी इकडे येत आहेत त्यांनी सांगावं असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.

महिला, कमिशन, संपत्ती… : आमदार अमोल मिटकरींविरुद्ध गंभीर आरोपांची माळ

नेमकं काय म्हणाले आहेत अब्दुल सत्तार मिटकरींबाबत?

अमोल मिटकरीच आमच्या संपर्कात असून ते कधी येता हे मिटकरींनी सांगावं असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. एवढंच नाही तर अमोल मिटकरींना चांगल्या डॉक्टरला दाखवायची गरज असून त्यानंतर मिटकरी मध्ये काय फॉल्ट आहे हे कळेल अस ही ते म्हणाले..ते अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना माध्यमांशी बोलत होते. आमचं सरकार हे सामान्यांचं सरकार आहे. हे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आत्महत्या रोखण्यासाठी दिवसरात्र कार्यरत असल्याचं सत्तार यांनी स्पष्ट केलं. औरंगाबादमध्ये मंत्रिपदासाठी भाजप कोणताही डबलगेम करत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

“२० लाखांसाठी २ लाख” : जयंत पाटलांसमोरच अमोल मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप

हे वाचलं का?

    follow whatsapp