Kolhapur Flood : NDRF ने कोरोना रूग्णाचीही पुराच्या पाण्यातून केली सुटका
NDRF, SDRF आणि स्थानिक बचाव पथकं ही सध्या पुराच्या पाण्यात अडकलेल्यांसाठी देवदूतच ठरत आहेत. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलं. कोरोना रूग्ण असलेल्या कोव्हिड सेंटर्समध्येही पाणी शिरलं अशात NDRF च्या पथकांनी कोरोना रूग्णांनाही सुरक्षित स्थळी हलवलं आहे. राकेश सिंग नावाच्या NDRF च्या अधिकाऱ्याने सांगितलं की ‘आंबेवाडी या गावातून आम्हाला फोन […]
ADVERTISEMENT
NDRF, SDRF आणि स्थानिक बचाव पथकं ही सध्या पुराच्या पाण्यात अडकलेल्यांसाठी देवदूतच ठरत आहेत. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलं. कोरोना रूग्ण असलेल्या कोव्हिड सेंटर्समध्येही पाणी शिरलं अशात NDRF च्या पथकांनी कोरोना रूग्णांनाही सुरक्षित स्थळी हलवलं आहे. राकेश सिंग नावाच्या NDRF च्या अधिकाऱ्याने सांगितलं की ‘आंबेवाडी या गावातून आम्हाला फोन आला, आम्हाला सांगण्यात आलं की एक कोरोना रूग्ण तिथेअडकला आहे. त्याची ऑक्सिजन लेव्हल 68 झाली आहे. आम्ही तिथे गेलो आणि त्याची सुटका केली. तसंच त्याला अँब्युलन्सही उपलब्ध करून दिली. ‘
ADVERTISEMENT
#MaharashtraRains @5Ndrf team evacuating a COVID19 patient following due protocols in Kolhapur area#ServiceWithSensitivity??#ServiceWithResponsibility ?? pic.twitter.com/CJyceAbUJK
— ѕαtчα prαdhαnसत्य नारायण प्रधान ସତ୍ଯପ୍ରଧାନ-DG NDRF (@satyaprad1) July 25, 2021
NDRF ची पाच पथकं शहरातल्या विविध भागात पुरामुळे अडकलेल्या कोरोना रूग्णांना सोडवण्याचं काम करत आहेत. ही सुटका करत असताना NDRF चे कर्मचारीही पीपीई किट घालून आणि सुरक्षेचे सगले निकष पाळून कोरोना रूग्णांची सुटका करत आहेत. NDRF चे डीजी सत्य नारायण प्रधान यांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, महाड, चिपळून या सगळ्याच ठिकाणी पावसाचं रौद्ररूप आणि थैमान पाहण्यास मिळालं. पाणी ओसरण्यास सुरूवात झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे अडकलेल्या लोकांची सुटका करणं. NDRF ची पथकं त्यासाठी सज्ज झाली. विविध ठिकाणी लोक अडकले होते तिथे बचावकार्य त्यांनी सुरू केलं आणि अडचणींमध्ये अडकलेल्या, समस्यांनी ग्रासलेल्या लोकांना सोडवलं.
हे वाचलं का?
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुराचं संकट अजूनही आहे. कोकणात पाणी ओसरलं असलं तरीही अनेक लोक बेघर झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेलं तळिये गाव तर दरडीखाली गडप झालं आहे. या घटनेने माळीण या वाहून गेलेल्या गावाची दुर्दैवी आठवण ताजी केली आहे. तळियेच्या दुर्घटनेत 53 लोकांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
तसंच महाराष्ट्रात घडलेल्या विविध दरड कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये 149 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशात मदत आणि बचावकार्य करणाऱ्या NDRF ची भूमिकाही महत्त्वाची ठरते आहे. बचाव छावण्या उभ्या करणं, लोकांना अन्नाची पाकिटं वाटणं, गाळ उपसणं, होडीच्या मदतीने, दोरीच्या मदतीने, हेलिकॉप्टरच्या मदतीने, आवश्यक त्या सगळ्या पर्यायांचा विचार करून NDRF कडून लोकांची सुटका केली जाते आहे. NDRF ची पथकं ही पुरात अडकलेल्या, संकटात सापडलेल्या लोकांसाठी देवदूतच ठरत आहेत. अशात आता कोरोना रूग्णांची सुटका करण्याचंही काम NDRF कडून केलं जातं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT