साताऱ्यात नवा विश्वविक्रम… एका दिवसात बनवला तब्बल 39.67 किलोमीटरचा रस्ता

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा तब्बल 39.671 किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार केला. यामध्ये 25.54 किमी रस्ता हा अवघ्या 14 तासात पूर्ण करुन विजापूर-सोलापूर 25.54 किमी रस्त्याचा विक्रमही मोडला असून नवा विक्रम स्थापित केला आहे. दरम्यान या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील नोंद झाली असल्याचं समजतं आहे.

ADVERTISEMENT

हे काम 3 शिफ्टमध्ये एकाच वेळी 6 ठिकाणी करण्यात आले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे 15 अभियंत्यांनी काम पाहिले. उद्योजकामार्फत 60 अभियंते, 47 पर्यवेक्षक, 23 गुणवत्ता नियंत्रक अभियंते, 150 वाहन चालक, 110 मजूर असे एकूण 390 कर्मचाऱ्यांद्वारे काम करण्यात आले. अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे यांनी स्वत: सूक्ष्म नियोजन करुन ते तडीस नेण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून सतत कार्यरत होते.

गुणनियंत्रक पथकामार्फत कामाच्या गुणनियंत्रणासाठी बिटुमिन एक्सट्रॅक्टर, बिटुमिन पेनीट्रोमीटर, केंबरप्लेंट, सिव्हस यासारखे साहित्य वापरण्यात आले. तसेच या कामासाठी 8 मॉडर्न बॅचमिक्स प्रकारे हॉटमिक्सर प्लॅन्ट, 7 मॉर्डन सेन्सर पेव्हर, 12 व्हायब्रेटरी रोल, 6 न्यूमॅटीक रोलर 180 डंपर (हायवा) व अन्य यंत्रसामुग्रींचा वापर करण्यात आला. 1100 मे. टन डांबर व 6000 घनमीटर खडीचा वापर करण्यात आला.

हे वाचलं का?

पोरासाठी कायपण ! ५ एकरावरची द्राक्षबाग काढून बापाने तयार केलं क्रिकेट ग्राऊंड

या कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कामासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्याचे अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार यांनी सांगितले. या उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, उद्योजक यांचे दूरध्वनीवरुन कौतुक केले.

ADVERTISEMENT

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले. हा उपक्रम कौतुकास्पर असून भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातील अभियंते व उद्योजक, कंत्राटदार यांच्यासाठी दिशादर्शी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

ADVERTISEMENT

नागपूरच्या शेतकऱ्याचा प्रताप, जमिनीचे पैसे मिळत नसल्यामुळे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन

असा झाला विक्रम

  • या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राजपथ टीमने सूक्ष्म नियोजन केले.

  • ३० किलोमीटरच्या या रस्त्याला सहा तुकड्यांमध्ये विभागण्यात आले.

  • प्रत्येक भागातील काम करण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत होती.

  • या कामासाठी एकूण ११,००० मेट्रीक टन बिटुमन काँक्रीट, त्यासाठी आठ हॉट मिक्स प्लांट होते.

  • काँक्रीटचे हे मटेरीअल पसरविण्यासाठी सहा पेव्हर, १२ टँडम रोलर व सहा पी.टी.आर. वापरण्यात आले.

  • या मटेरीअलची ने-आण करण्यासाठी एकूण १८० हायवा टिप्पर वापरण्यात आले.

  • प्रकल्प व्यवस्थापक, तीन हायवे इंजिनिअर, दोन क्लालिटी इंजिनिअर, दोन सर्व्हेअर आणि ७१ कर्मचारी असे एकूण ७९ कर्मचारी एका टीममध्ये होते.

  • एकूण सहा भागांचे मिळून ४७४ कर्मचारी पुर्ण कामासाठी तैनात होते.

  • यासाठी व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT