डोंबिवली: ढोल-ताश्यांच्या गजरात निघणार यंदाची स्वागतयात्रा, गुढीपाडव्याला रस्ते गजबजणार

मुंबई तक

गेल्या दोन वर्षांत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द झालेली गुढीपाडव्याची नववर्ष स्वागत यात्रा यंदाच्या वर्षात जोमाने आयोजित केली जाणार आहे. यंदा गुढी पाडव्याचे औचित्य साधून संस्कार भारतीच्या वतीने ७५ कलाकार एकाचवेळी ७५ रांगोळ्या सकाळी सात वाजता फडके रोडवर साकारणार आहेत. यासाठी ८० किलो रंग व ३०० किलो रांगोळीचा वापर करणार आहेत. विविध धार्मिक कार्यक्रमांसह कोरोना योद्धांच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गेल्या दोन वर्षांत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द झालेली गुढीपाडव्याची नववर्ष स्वागत यात्रा यंदाच्या वर्षात जोमाने आयोजित केली जाणार आहे. यंदा गुढी पाडव्याचे औचित्य साधून संस्कार भारतीच्या वतीने ७५ कलाकार एकाचवेळी ७५ रांगोळ्या सकाळी सात वाजता फडके रोडवर साकारणार आहेत. यासाठी ८० किलो रंग व ३०० किलो रांगोळीचा वापर करणार आहेत.

विविध धार्मिक कार्यक्रमांसह कोरोना योद्धांच्या सन्मान यात्रेचे संयोजक श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषद घेत संस्थानचे अध्यक्ष राहूल दामले यांनी माहिती दिली.

मराठी नववर्षाचे स्वागत स्वागतयात्रेने करण्याची परंपरा श्री गणेश मंदिर संस्थानकडून सुरु करण्यात आली. डोंबिवली स्वागतयात्रेची परंपरा ही सातासमुद्रापार पोहोचली असून राज्याच्या काना कोपऱ्यात आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांकडून देखील स्वागतयात्रा काढली जाते. कोरोनामुळे गेले दोन वर्षे या यात्रेत खंड पडला असला तरी आता कोरोनाचे सावट यावर्षी हटले असून यावर्षी त्याच जल्लोषात स्वागतयात्रा काढण्याचा निर्णय श्री गणेश मंदिर संस्थानने घेतला आहे. कोरोना काळात ज्या डॉक्टर, परिचारिका, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे सफाई कामगार तसेच अंत्यविधी करणारा कर्मचारी वर्ग ज्यांनी अंत्यविधीत प्रत्यक्षपणे सहभाग घेत समाजाची सेवा केली आहे. त्यांचा सत्कार स्वागत यात्रेत केला जाणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp