Maharashtra Flood : धोका टळलेला नाही, कोकण-मध्य महाराष्ट्रासाठी पुढील ३ दिवस धोक्याचे – IMD चा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकणासह, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भात नागपूर-गडचिकोली, अकोला भागात पावसाने चांगलीच बॅटींग केली आहे. कोकणात पावसाने उसंत घेतलेली असली तरीही कोल्हापूरमधली परिस्थिती अद्याप नियंत्रणात येत नाहीये. त्यातच हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे राज्यासमोरचं संकट आणखीनच वाढलं आहे.

पुढचे ३ ते ४ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहे. कोकण आणि गोव्यात २४ तारखेलाही हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे, तर २५ ते २७ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रासाठीही हवामान विभागाने अशाच प्रकारचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर रुळावर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोकणासमोर संकट आणखी वाढण्याची चिन्ह आहेत.

Flood in Konkan : …फक्त लढ म्हणा! पूर ओसरला, आता चिखलातून सावरण्याचं आव्हान

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याचसोबत मराठवाडा आणि विदर्भातही २७ जुलैपर्यंत हवामान विभागाने बऱ्याच अंशी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला आहे. २७ जुलैपर्यंत मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

२४ ते २७ जुलैदरम्यान रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्याचा परिसर, सातारा, पुणे, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस राज्यातील जनतेसोबत प्रशासकीय यंत्रणांनाही दक्ष राहण्याची गरज आहे.

ADVERTISEMENT

Flood in Maharashtra : कोकणाला पुराच्या पाण्याचा विळखा, अंगावर काटा आणणारे हे फोटो पाहिलेत का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT